आर्मेनियात मोठी दुर्घटना; लष्कराच्या बॅरेकमध्ये लागलेल्या आगीत 15 जवानांचा होरपळून मृत्यू I Armenian Soldiers | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Armenian Soldiers

अर्मेनियाच्या पूर्व गेघारकुनिक भागातील अजात गावात आज आगीची ही घटना घडली.

Armenian Soldiers : आर्मेनियात मोठी दुर्घटना; लष्कराच्या बॅरेकमध्ये लागलेल्या आगीत 15 जवानांचा होरपळून मृत्यू

आर्मेनियामध्ये आज (गुरुवार) एक मोठी दुर्घटना घडलीये. येथील लष्करी तुकडीच्या बॅरेकमध्ये भीषण आग लागलीये. यामध्ये 15 आर्मेनियन सैनिक ठार झाले, तर तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

आर्मेनियाच्या संरक्षणमंत्र्यांनी ही माहिती दिलीये. मंत्रालयानं सांगितलं की, "प्राथमिक माहितीनुसार इंजिनीअर आणि स्नायपर कंपनीच्या बॅरेकमध्ये लागलेल्या आगीत 15 सैनिक ठार झाले आणि तीन सैनिकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे."

हेही वाचा: Jacinda Ardern : 'हीच योग्य वेळ' म्हणत न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचा राजीनामा; जॅसिंडा म्हणाल्या, मला पराभवाची..

मंत्रालयानं पुढं सांगितलं की, अर्मेनियाच्या पूर्व गेघारकुनिक भागातील अजात गावात आज आगीची ही घटना घडली. रात्री 1.30 च्या सुमारास लष्कराच्या बॅरेकमध्ये ही आग लागली. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, असं मंत्रालयानं म्हटलंय. यापूर्वी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अशीच घटना घडली होती. आर्मेनियाची राजधानी येरेवनच्या गजबजलेल्या बाजारपेठेत स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली. या घटनेत डझनहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.