esakal | म्यानमारमध्ये 'रक्तरंजित' रविवार; लष्कराने केलेल्या गोळीबारात 18 निदर्शकांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

myanmar}

म्यानमारमध्ये सैन्याने केलेल्या सत्तापालटाविरोधात नागरिक निदर्शने करत आहेत. रविवारी निदर्शने करणाऱ्या लोकांवर सैन्याने गोळ्या चालवल्याचा प्रकार घडला.

म्यानमारमध्ये 'रक्तरंजित' रविवार; लष्कराने केलेल्या गोळीबारात 18 निदर्शकांचा मृत्यू
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

यांगून- म्यानमारमध्ये सैन्याने केलेल्या सत्तापालटाविरोधात नागरिक निदर्शने करत आहेत. रविवारी निदर्शने करणाऱ्या लोकांवर सैन्याने गोळ्या चालवल्याचा प्रकार घडला. धक्कादायक म्हणजे या गोळीबारात 18 निदर्शकांचा मृत्यू झाला आहेत, तर 30 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे.  एका हिंदी वृत्त माध्यमाने यासंदर्भातील बातमी दिली आहे. 

म्यानमारमधील अनेक शहरांमध्ये आंदोलन सुरु आहे. यांगून, दवेई आणि मंडाले हे शहरे आंदोलनाचे केंद्र बनले आहेत. याच शहरामध्ये नागरिकांचा गोळीबारात मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. निदर्शकांविरोधात पोलिसांनी अश्रू धुळकांड्या आणि गोळ्यांचा वापर केला. कार्यालय प्रवक्ता रविना शामदसानी यांनी म्हटलंय की,  आम्ही म्यानमारी निदर्शकांविरोधात वाढलेल्या हिंसेची निंदा करतो. तसेच सैन्याने शांतीपूर्ण पद्धतीने निदर्शने करणाऱ्यांना लोकांविरोधात हिंसेचा वापर तत्काळ थांबवावा असं आवाहन करतो. 

वॉरेन बफेट यांची 74 हजार कोटी रुपयांची एक चूक, याआधीही केल्यात मोठ्या मिस्टेक

सत्ता सोपवण्याची मागणी

देशाची नेता आंग सांग स्यु की यांच्या नवनिर्वाचित सरकारकडे लष्कराने सत्ता सोपवावी अशी मागणी निदर्शकांनी केली आहे. निदर्शकांनी देशातील अनेक भागात आंदोलन छेडले आहे. लष्कराने अनधिकृतपणे हाती घेतलेली सत्ता पुन्हा आंग सांग स्यु की यांच्याकडे सोपवावी, अशी मागणी लोकांनी केली आहे. मात्र, लष्कराने कठोर भूमिका घेतली असून निदर्शकांविरोधात हिंसेचा वापर सुरु केले आहे. अनेक ठिकाणी पोलिस आणि निदर्शकांमध्ये झालेल्या झडपेत निदर्शकांना मृत्यू झाला आहे. 

ब्रेकिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस

रविवारी झाली हिंसा

देशातील विद्यार्थ्यांनीही लष्कराविरोधात भूमिका घेतली आहे. अनेक विद्यार्थी रस्स्त्यावर उतरुन आंदोलन करत आहे. रविवारी मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. यावेळी हिंसा भडकली. घटनेच्या जारी झालेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये निदर्शक पळत असल्याचं दिसत आहे. राजधानीमधील हिंसेची माहिती देण्यात आलेली नाही. रस्त्यावर गोळ्यांचा आवाज ऐकायला मिळाला, तसेच स्मोग ग्रॅनेड फेकण्यात आल्याचीही माहिती आहे. आतापर्यंत देशातील 854 निदर्शकांना अटक करण्यात आली आहे.