पाकमध्ये भीषण अपघातात 19 शीख यात्रेकरू ठार; मोदींनी वाहिली श्रद्धांजली

वृत्तसंस्था
Friday, 3 July 2020

पाकिस्तानमधील शेखुपुरा येथे बस आणि रेल्वेमध्ये झालेल्या भीषण अपघातात 29 लोकांचा मृत्यू झाला आहे. मरणाऱ्यांमध्ये अधिकतर शीख भाविक होते.

इस्लामाबाद- पाकिस्तानमधील शेखुपुरा येथे बस आणि रेल्वेमध्ये झालेल्या भीषण अपघातात 29 लोकांचा मृत्यू झाला आहे. मरणाऱ्यांमध्ये अधिकतर शीख भाविक होते. मिळालेल्या माहितीनुसार, ही अपघात नानकाना साहब जवळ फाटक नसलेल्या क्रॉसिंगवर झाला आहे. यात कमीतकमी 19 शीख यात्रेकरुंचा मृत्यू झाला आहे. यात महिला आणि लहान मुलाचाही समावेश आहे. मिनी बसमध्ये एकूण 26 प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती कळत आहे.

शुक्रवारी प्रवाशांनी भरलेली एक बस आणि शाह हुसैन एक्सप्रेस रेल्वे यांच्यामध्ये जोराची टक्कर झाली. यात कमीतकमी 19 शीख  यात्रेकरु मेल्याची माहिती आहे. तर अनेकजण जखमी झाले असल्याचे कळत आहे. जखमींना लाहोरमधील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणी दोषी असलेल्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

पंजाब देणार चीनला मोठा दणका, सायकल उद्योगात हालचाली सुरू
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कराची वरुन लाहौरला जाणारी शाह हुसैन एक्सप्रेस दुपारी अडीच वाजता फर्रुकाबादमधील एका मानव रहित क्रॉसिंगवरुन जात होती. याचवेळी एक मिनी बस रस्ता पार करत होती. या दोघांमध्ये भीषण अपघात झाला. बसमध्ये अधिकतर शीख भाविक बसले होते. ही घटना लाहोरपासून 60 किलोमीटर दूर अंतरावर घडली आहे. इवैक्यू ट्रस्ट प्रोपर्टी बोर्ड (ईटीपीबी) चे प्रवक्ता आमिर हाशमी यांनी दुर्घटनेत 29 जणांचा जीव गेल्याची माहिती दिली आहे. यामध्ये अधिकतर पाकिस्तानी शीख यात्रेकरु होते होते. या यात्रेकरुंनी फर्रुकाबाद येथील गुरुद्वारा सच्चा सोदाला भेट दिली होती. ते पेशावरला परत आपल्या गावी निघाले होते. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे.  पाकिस्तानमधील शिख यात्रेकरुंच्या दुर्घेटनेमुळे मला दु:ख झालं आहे. या दु:खाच्या क्षणी माझे विचार त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांसोबत आहेत. जे यात्रेकरु जखमी झाले आहेत, ते लवकर बरे व्हावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो, असं मोदी म्हणाले आहेत. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. शिवाय जखमींवर योग्य ते उपचार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 19 Sikh pilgrims killed in horrific bus and train accident Incidents in Pakistan