
देअलबाला : इस्राईलने आज पहाटे दक्षिण गाझा पट्टीत केलेल्या जोरदार हल्ल्यांमध्ये किमान २६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये हमासच्या एका राजकीय नेत्याचाही समावेश आहे. दरम्यान, इस्राईलने केलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ येमेनमधील हौथी बंडखोरांनी इस्राईलवर क्षेपणास्त्र हल्ला केला. मात्र, हे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यात आले.