चार वर्षांचा मुलगा आईसाठी ठरला सुपरहिरो; जन्मदातीचा ‘असा’ वाचवला जीव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

boy saved mothers life

चार वर्षांचा मुलगा आईसाठी ठरला सुपरहिरो; जन्मदातीचा ‘असा’ वाचवला जीव

नवी दिल्ली – चार वर्षांच्या बाळाला फारस कळत नाही, असा आपल्या सर्वांचा समज आहे. मात्र आताच्या पिढी मुळातच अत्यंत हुशार आहे. याच असंच एक उदाहरण समोर आलं आहे. एका चार वर्षाच्या मुलाने रुग्णवाहिका बोलावून आपल्या बेशुद्ध आईचे प्राण वाचवल्याचं स्पष्ट झालं आहे. (boy saved mothers life News in Marathi)

हेही वाचा: आमचं नातं कसंय हे नरेंद्र मोदीच सांगतील; डोनाल्ड ट्रम्प यांनी गायले गोडवे

लहान मुलाने आपत्कालीन क्रमांकावर फोन करून मदत मागितली होती. आईला बेशुद्ध पडताना पाहून मुलाने मदतीसाठी आपत्कालीन क्रमांकावर मदत मागितली होती. ऑस्ट्रेलियाच्या रुग्णवाहिका कंपनी तस्मानियाने मंगळवारी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. या मुलाचे नाव मॉन्टी असून त्याला आदल्या दिवशीच त्याच्या आईने इमर्जन्सी नंबर 000 डायल करायला शिकवले होते.

आई बेशुद्ध पडल्याचं लक्षात आल्यानंतर मुलाने आपल्या ज्ञानाचा उपयोग आपली आई वेंडीचा जीव वाचवण्यासाठी केला. घरात झटका आल्यानंतर मुलाची आई बेशुद्ध झाली होती.

मुलाने रुग्णवाहिका तस्मानियाच्या फोन ऑपरेटरला सांगितले की "मम्मी कोसळली आहे. तसेच घरातील पाळीव कुत्रा भुंकत आहे. हे ऐकून पॅरामेडिकल स्टाफ चकीत झाला. असा परिस्थितीत मॉन्टीला काय करावे हे माहित होतं. तसेच त्याने सर्व सूचनांचे योग्य पालन केले होते. शिवाय तो संपूर्ण घटनेदरम्यान शांत होता. मॉन्टीला परिसरातील लोक सुपरहिरो म्हणत आहेत.

मॉन्टीची आई वेंडी, म्हणाली की, "मला खूप अभिमान आहे, की मॉन्टी माझा छोटा मुलगा आहे. त्याने खरोखरच मोठे नुकसान वाचवले. वेंडी स्वत: एक परिचारिका आहेत. तिने आपल्या मुलांना फोन अनलॉक करणे, आणि आपत्कालीन परिस्थिती कशी हताळायची हे शिकवलं आहे.

Web Title: 4 Years Old Boy Saved Mothers Life

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :motheraustralia