युएसमध्ये फायझर लसीच्या चाचणीत सहभागी 40 टक्के गर्भवती महिलांचा गर्भपात : रिपोर्ट

vaccine trial
vaccine trial

वॉशिंग्टन : भारत सरकारने फायझर आयात करावे अशी इच्छा असलेल्या उदारमतवाद्यांना मोठा धक्का बसला आहे कारण कोर्टाच्या आदेशानुसार नुकत्याच जाहीर झालेल्या फायझर दस्तऐवजानुसार, फायझरच्या mRNA कोविड लसीच्या चाचणीत सहभागी झालेल्या 40 टक्क्यांहून अधिक गर्भवती महिलांचा गर्भपात झाल्याचं स्पष्ट झालं आहे. (Pfizer vaccine trial suffered miscarriages news in Marathi)

vaccine trial
ट्रम्प कुटुंबाच्या भारत दौऱ्यावेळी मोदी सरकारची उधळपट्टी, RTIचा धक्कादायक खुलासा

कागदपत्रांच्या विश्लेषणानुसार, 50 गर्भवती महिलांपैकी 22 महिलांनी त्यांची बाळं गमावली. स्त्रीवादी लेखिका आणि पत्रकार डॉ. नाओमी वुल्फ यांनी स्टीव्ह बॅननच्या वॉर रूम पॉडकास्टवर ही माहिती उघड केली.

वुल्फ तिच्या वेबसाइट डेली क्लाउटद्वारे फायझर दस्तऐवजांचे संशोधन आणि विश्लेषणाचे करणाऱ्या गटाचे नेतृत्व करत आहे. पॉडकास्ट दरम्यान, वुल्फ म्हणल्या की गर्भपात दर्शविणारा प्रतिकूल अहवाल 13 मार्च 2021 आला होता. तो अहवाल अन्न आणि औषध प्रशासनाला (FDA) 1 एप्रिल 2021 रोजी प्राप्त झाला.

सत्य माहित असूनही गप्प राहिल्याबद्दल वुल्फ यांनी एफडीएवर निशाणा साधला आहे. तसेच "एफडीएला एप्रिल 2021 च्या सुरुवातीपर्यंत भ्रूण मृत्यूच्या वाढलेल्या दराची जाणीव होती, तरी ते शांत होते, असं वुल्फ यांनी म्हटलं.

वुल्फ यांनी पुढे असेही निदर्शनास आणून दिले की, फायझर चाचणीचा बाहेर आलेला डेटा जगभरात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गर्भपाताच्या वाढीशी संबंधित आहे. धक्कादायक म्हणजे, सीडीसीने, अलीकडेच गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या 'लोकांसाठी' प्रायोगिक mRNA लसींची शिफारस केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com