esakal | मराठमोळा स्वॅग! चक्क साडी नेसून केलं स्केटिंग; पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

मराठमोळा स्वॅग! चक्क साडी नेसून केलं स्केटिंग; पाहा व्हिडिओ

मराठमोळा स्वॅग! चक्क साडी नेसून केलं स्केटिंग; पाहा व्हिडिओ

sakal_logo
By
शर्वरी जोशी

साडी नेसून धाडसी काम करण्याचा एक नवा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. अलिकडेच पुण्याच्या एका महिलेने साडी नेसून वर्कआऊट केला होता. तर, त्यांच्या पूर्वी एका महिलेने घोडेस्वारी केली होती. त्यामुळे या दोन्ही महिलांची सोशल मीडियावर चर्चा आहे. त्यातच आता या स्त्रियांप्रमाणेच एका महिलेने चक्क साडी नेसून स्केटिंग Skating केलं आहे. आता मुळात स्टेकिंग करताना तोल आणि संयम सांभाळणं किती गरजेचं आहे साऱ्यांनाच माहित आहे. मात्र, या महिलेने चक्क साडी नेसून स्केटिंग Skating केलं आहे. त्यामुळे सध्या ती नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. (46-year-old-skater-aunty-skates-wows-people-with-her-moves)

सोशल मीडियावर चर्चेत आलेली महिला टोरंटो येथे राहत असून त्यांचं नाव ओर्बी रॉय असं आहे. विशेष म्हणजे वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी हा धाडसी स्टंट केला आहे. ओर्बी यांनी साडी नेसून स्केटिंग केलं आणि स्वत:च हा व्हिडीओ शेअर केला.

हेही वाचा: एका लग्नाची गोष्ट! डोंबिवलीत मंगलाष्टका अन् कॅनडात लग्न

दरम्यान, ओर्बी यांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ त्यांनी auntyskates या इन्स्टाग्राम पेजच्या रिअलमध्ये शेअर केला होता. त्यानंतर पाहता पाहता हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

loading image
go to top