Sudan Army : सुदानमधील हिंसक संघर्षात 47 ठार तर 380 जण जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

सुदानमध्ये सैन्य दल (Sudan Army) आणि निमलष्करी गटात संघर्ष सुरू आहे.
Violent Clashes Khartoum Sudan
Violent Clashes Khartoum Sudanesakal
Summary

सुदानच्या स्थितीवर जागतिक समुदायानं चिंता व्यक्त केली असून सर्व पक्षांनी हिंसाचार थांबवण्याचं आवाहन केलंय.

खार्तूम : सुदानमधील हिंसक संघर्षात आतापर्यंत 47 जणांचा मृत्यू झालाय, तर 380 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती सुदानच्या डॉक्टर्स असोसिएशनं दिलीये. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृतांमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

सुदानमध्ये सैन्य दल (Sudan Army) आणि निमलष्करी गटात संघर्ष सुरू आहे. यातूनच सुदानी सैन्यासह निमलष्करी गटात शनिवारी राजधानी खार्तुम इथं चकमक झाली. यामध्ये किमान 47 जणांचा मृत्यू झाला तर 380 जण गंभीर जखमी झाले.

Violent Clashes Khartoum Sudan
Sachin Pilot : सचिन पायलटांनी काँग्रेस हायकमांडला पकडलं कोंडीत; पक्षाकडं उरला 'हा' शेवटचा पर्याय

याबाबत सीएनएननं केंद्रीय वैद्यकीय समितीचा हवाल्यानं वृत्त दिलं. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सीएनएननं दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय खार्तूममधील फेडेल हॉस्पिटलमध्ये गेल्या काही तासांत डझनभर जखमी नागरिक आणि लष्करी कर्मचारी दाखल झाले आहेत, जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

Violent Clashes Khartoum Sudan
Karnataka Election : कर्नाटक जिंकण्यासाठी भाजपनं बनवली Super 60 टीम; 'या' नेत्यांवर सोपवली जबाबदारी

शनिवारी प्रसिद्ध झालेल्या युनियनच्या अहवालानुसार, सुदानीज डॉक्टर्स ट्रेड युनियननं यापूर्वी दिलेल्या निवेदनात, खार्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर किमान तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, सुदानमधील सशस्त्र दलांच्या प्रतिस्पर्धी गटांमध्ये संघर्ष झाला. शनिवारी सकाळी खार्तूमच्या विविध भागांमध्ये अनेक गोळीबार आणि स्फोट झाले. रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) या सुदानी निमलष्करी गटानं अध्यक्षीय राजवाड्यावर ताबा मिळवल्याचा दावा केलाय. सुदानच्या स्थितीवर जागतिक समुदायानं चिंता व्यक्त केली असून सर्व पक्षांनी हिंसाचार थांबवण्याचं आवाहन केलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com