Lahore Blast : लाहोरमधील बॉम्बस्फोटात आठ ठार तर, 24 गंभीर

वृत्तसंस्था
बुधवार, 8 मे 2019

पाकिस्तानातील लाहोरमध्ये दाता दरबार मशीदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात आठजण ठार तर 24 जण जखमी झाल्याची घटना आज (ता.08) बुधवारी सकाळी घडली आहे. जखमी 24 जणांमधील 08 जणांची परिस्थिती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी मायो हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे.

लाहोर: पाकिस्तानातील लाहोरमध्ये दाता दरबार मशीदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात पाचजण ठार तर 24 जण जखमी झाल्याची घटना आज (ता.08) बुधवारी सकाळी घडली आहे. जखमी 24 जणांमधील 08 जणांची परिस्थिती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी मायो हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानमधील लाहोरच्या दाता दरबारी मशिदीजवळ आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला.

पोलिस अधिक्षक सय्यद शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 पैकी 08 जणांची परिस्थीती अत्यंत गंभीर आहे. परिसरात बचावकार्य चालू असून या भागात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलिस करत असून बॉम्बहल्ला कोणी केला आहे याचा तपास लागलेला नाही.

मृतांमध्ये सैन्याच्या 3 अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती लाहोरचे पोलिस महासंचालक अशफाक अहमद खान यांनी दिली. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हा बॉम्बस्फोट मशिदीच्या गेट क्रमांक 2 च्या जवळील एका गाडीजवळ झाला. मशिदीजवळील पोलिसांची गाडी उडवण्यासाठी हा स्फोट केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दाता दरबार मशिद पाकिस्तानमधील सर्वाधिक गर्दी असलेल्या मशिदींपैकी एक आहे. हा आत्मघातकी स्फोट असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 dead, 24 injured in explosion near Data Darbar in Lahore