चीनचं करायचं तरी काय? आता पार्सलमध्ये आढळले ५ हजार मृत पाळीव प्राणी

china
china
Updated on

बीजिंग- मध्य चीनच्या हेनिन प्रांतात एका लॉजिस्टिक केंद्रात सुमारे ५ हजार प्राणी पार्सल बॉक्समध्ये मृतावस्थेत आढळून आल्याचे स्थानिक वृत्तपत्राने म्हटले आहे. या मृत प्राण्यात ससा, गिनिया डुक्कर, मांजर आणि कुत्र्याचा समावेश असल्याचे प्राणी संरक्षण संस्थेच्या कार्यकर्त्याने सांगितले.

हेनिन प्रांतातील डॉगझिंग लॉजिस्टिक केंद्रात सप्टेंबरच्या प्रारंभीच्या काळात सुमारे ६ हजार लहान खोक्यातून प्राण्यांची ने आण करण्यात आली. २२ सप्टेंबर रोजी मृत जनावरांची संख्या अधिक होती, असे प्राणी संरक्षण संस्थेच्या कार्यकर्त्या डॅन यांनी म्हटले आहे. यादरम्यान प्राणीप्रेमी संस्थेने लॉजिस्टिक केंद्रावर धाव घेत तेथे बॉक्समध्ये असलेले ५० मांजर, २०० सशांना वाचवले. मात्र एकूण मृत प्राण्याच्या तुलनेत हे वाचवण्याचे प्रमाण पाचच टक्के आहे. महिनाभरात एकुण मृत प्राण्यांची संख्या ५ हजाराच्या आसपास असावी. बहुतांश प्राणी गुदमरल्याने, उपासमार झाल्याने किंवा पाण्याविना मृत झाल्याचे संस्थेने म्हटले आहे. यापैकी काही प्राण्यांवर दफनविधीही करण्यात आला आहे. वाचवण्यात आलेल्या प्राण्यांना स्थानिक नागरिकांनी दत्तक घेतले. याशिवाय काही आजारी प्राण्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे.

पूर्व चीनमधील अनहुई प्रांतातील एका प्रजनन संस्थेतून हे प्राणी पाठवले गेले असावेत, असा संशय आहे. देशभरातून ऑनलाइनवर पाळीव प्राण्यांची खरेदी झाली. त्यानंतर या प्राण्यांना लॉजिस्टिक कंपनीमार्फत पाठवण्यात आले. यादरम्यान कंपनीकडून प्राण्यांची देखभाल घेतली गेली नाही आणि त्यांचा गुदमरून आणि उपासमारीमुळे मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

प्लॅस्टिक आवरणात प्राणी

तीन ट्रकमधून या प्राण्यांना हेनिन प्रांतात १७ सप्टेंबर रोजी आणण्यात आले. लुओहे येथील लॉजिस्टिक केंद्रावर प्राणी असलेले खोकी उतरवण्यात आली. मात्र असंख्य प्राण्यांचा वाटेत प्रवासातच मृत्यू झाला. युंडा नावाच्या एक्स्प्रेस कंपनीमार्फत या प्राण्यांची डिलिव्हरी केली जात होती. बॉक्सला मोठी छिद्र होते, असे युंडा कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र प्राणीप्रेमींनी अशा प्रकारच्या वाहतुकीला आक्षेप घेतला आहे. हे प्राणी प्लॅस्टिकच्या आवरणात किंवा लोखंडी पिंजऱ्यात ठेवण्यात आली होती, असे सांगण्यात आले.

चीनच्या कायद्यानुसार जीवंत प्राण्यांची पार्सलद्वारे ने-आण करण्यास चीनमध्ये बंदी आहेत. पोस्टलद्वारे अशा प्रकारे प्राणी पाठवणे गैर आहे, असे वकिल झांग बो यांनी सांगितले. याबाबत कोणत्याही शिक्षेची तरतुदीशिवाय १९९० च्या काळात आणलेला कायद्याची अंमलबजावणी करणे कठिण आहे, असेही झांग बो म्हणाले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com