Air Pollution : हवा प्रदूषणाविरुध्द लढण्यासाठी जग सरसावले; आरोग्यावरील दुष्परिणाम कमी करण्याची भारतासह ५० देशांची प्रतिज्ञा
WHO : भारतासह ५० देशांनी २०४० पर्यंत हवा प्रदूषणाचे आरोग्यावरील दुष्परिणाम निम्मे करण्याची प्रतिज्ञा केली आहे. डब्लूएचओच्या परिषदेत सर्व देशांनी एकत्र येऊन प्रदूषणाविरोधात लढण्याचा निर्धार केला.
कार्टाजेना (कोलंबिया) : जगभरात हवा प्रदूषणाचा धोका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतासह ५० देशांनी हवा प्रदूषणाचे आरोग्यावरील दुष्परिणाम २०४० पर्यंत निम्म्याने कमी करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे.