esakal | माणुसकी जिवंत आहे का? कत्तलखान्यात पाठवण्यासाठी ५० कुत्र्यांना केलं पिंजऱ्यात बंद

बोलून बातमी शोधा

Dog
माणुसकी जिवंत आहे का? कत्तलखान्यात पाठवण्यासाठी ५० कुत्र्यांना केलं पिंजऱ्यात बंद
sakal_logo
By
शर्वरी जोशी

गेल्या काही काळापासून मुक्या प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. दररोज आपल्या कानावर मुक्या प्राण्यांवर करण्यात आलेल्या अमानुष अत्याचाराच्या घटना पडत आहेत. त्यातच नुकताच एक धक्कादायक प्रकार दक्षिण कोरियामध्ये घडला आहे. एका व्यक्तीने त्याच्या शेतात तब्बल ५० कुत्र्यांना कैद केलं होतं. या घटनेची सोशल मीडियावर चर्चा रंगली असून संबंधित व्यक्तीला फरार झाला आहे.

द. कोरियातील एका व्यक्तीने त्याच्या शेतावरील घरात तब्बल ५० कुत्र्यांना कैद केलं होतं. या कुत्र्यांना कत्तलखान्यात पाठवण्याच्या उद्देशाने कैद करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने केवळ त्यांना कैदच केलं नाही. तर या मुक्या जनावरांचे अतोनात हाल केलं. अनेक दिवस या मुक्या प्राण्यांना उपाशी ठेवण्यात आलं तर त्यांना मारहाणदेखील करण्यात आली.

Yongin शहरातील एका व्यक्तीने ५० कुत्र्यांना कैद केल्याची माहिती पोलिस व प्राणी संघटनेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस व प्राणी संघटनेने घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत कुत्र्यांना कैद करणारी व्यक्ती फरार झाली होती. अॅनिमल प्रोटेक्शन वर्कसने या ५० कुत्र्यांचे प्राण वाचवले असून सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्याक येत आहेत.

दरम्यान, सुटका करण्यात आलेले श्वान प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होते. इतकंच नाही तर अन्न न मिळाल्यामुळे ते अशक्त झाले असून त्यांना पिंजऱ्यात उभंदेखील राहता येत नव्हतं. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.