सौदीचे विमान घसरून 53 प्रवासी जखमी

यूएनआय
बुधवार, 23 मे 2018

सौदी अरेबिया एअरलाइन्सचे "एअरबस ए 330' हे विमान जेद्दामध्ये आपत्कालीन परिस्थितीत उतरविण्यात आले. विमान धावपट्टीवर उतरताना 53 जण जखमी झाले, असे विमान उड्डाण अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. 

रियाध - सौदी अरेबिया एअरलाइन्सचे "एअरबस ए 330' हे विमान जेद्दामध्ये आपत्कालीन परिस्थितीत उतरविण्यात आले. विमान धावपट्टीवर उतरताना 53 जण जखमी झाले, असे विमान उड्डाण अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. 

हे विमान 151 प्रवाशांसह सोमवारी (ता. 21) मदिनाहून ढाक्‍याला चालले होते. विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने सोमवारी (ता. 21) रात्री उशिरा ते जेद्दाकडे वळविण्यात आले, अशी माहिती सौदीच्या विमान उड्डाण तपास यंत्रणेने दिली. विमान धावपट्टीवर उतरत असताना ते घसरल्याचे व त्याच्या शेपटाकडील भागात आग लागल्याचा व्हिडिओ चित्रीकरणात दिसले. आप्तकालीन शिडीद्वारे प्रवाशांची सुटका करण्यात आली. यात 52 जणांना किरकोळ जखमा झाल्या. एका महिला प्रवाशाला फ्रॅक्‍चर झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 53 injured as Saudi jet makes emergency landing