काबूल एअरपोर्टवर चेंगराचेंगरी; सात नागरिकांचा मृत्यू

kabul airport
kabul airport
Summary

काबुल एअरपोर्टवर झालेल्या चेंगराचेंगरी सात अफगाणी लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. काबूल एअरपोर्टवर तालिबान्यांनी गोळीबार केला होता.

काबूल- काबुल एअरपोर्टवर झालेल्या चेंगराचेंगरी सात अफगाणी लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. काबूल एअरपोर्टवर तालिबान्यांनी गोळीबार केला होता. त्यातून निर्माण झालेल्या गोंधळामुळे लोक बिथरले आणि सैरावैरा पळू लागले. यातून झालेल्या चेंगराचेंगरीत सात अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तान सोडण्यासाठी अफगाण नागरिक एअरपोर्टवर आले होते. चेंगराचेंगरीत अनेकजण जखमी झाल्याचीही माहिती आहे. (Afghanistan Latest News)

हजारो अफगाण नागरिक देश सोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सध्या काबूलमधील विमानतळ अमेरिकी सैन्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे नागरिकांनी या विमानतळाकडे धाव घेतली आहे. पण, नागरिकांच्या या पलायनाला तालिबान्यांनी विरोध केला आहे. त्यांनी नागरिकांच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण केले आहेत. त्यांना विमानतळापर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी बळाचा वापर केला आहे. अशाच एका घटनेत तालिबान्यांनी गोळीबार केला. त्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळातून चेंगराचेंगरी झाली. यात सात अफगाण नागरिकांचा मृत्यू झाल्याचं ब्रिटिश संरक्षण मंत्रालयाने सांगितलं आहे.

kabul airport
अफगाणमधील केळी निर्यातीच्या ऑर्डर रद्द! तालिबानी राजवटीचा परिणाम

अफगाणिस्तानमधील स्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे. तालिबान्यांच्या अत्याचाऱ्याच्या भीतीने लोक देश सोडण्यासाठी उतावीळ झाले आहेत. त्यामुळे ते जमेल त्या पर्यायाचा अवलंब करत आहेत. काबूल विमानतळावर अफगाण नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी ही गर्दी पांगवण्यासाठी तालिबानी दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार केला. यावेळी लोकांची धावपळ सुरु झाली. यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत कमीतकमी सात जणांचा मृत्यू झाला आहे. किमान 40 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

kabul airport
VIDEO: तालिबानकडून पोलीस प्रमुखाची भररस्त्यात हत्या

हजारो अफगाण नागरिक विमानतळाबाहेर जमा झाले आहेत. यात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. लोक गेट आणि तारांचे कुंपण तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मदतीसाठी याचना करत आहेत. अफगाण नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अनेक देश मदत करत आहेत. नाटोने या लोकांसाठी विमान पाठवण्याची परवानगी दिली आहे. भारताने एअरलिफ्ट मोहीम हाती घेतली आहे. आज सकाळी दोन विमानांच्या माध्यमातून अनुक्रमे 87 आणि 186 नागरिकांना भारतात आणण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com