भूकंपाच्या धक्क्याने रशिया हादरले; सुनामीचा इशारा

वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

जगभर कोरोनाची दहशत पसरलेली असतानाच रशियाला भूकंपाचे धक्के बसले आहेत. रशियाचा फार ईस्ट भाग बुधवारी ७.२ रिश्टर स्केल तीव्रेतच्या भूकंपाच्या धक्क्याने हादरला. या भूकंपाच्या धक्क्यामुळे सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. कुर्ली बेटापासून भूकंपाचा केंद्रबिंदू जवळ आहे. रशियाच्या स्थानिकवेळेनुसार बुधवारी दुपारी हे भूकंपाचे धक्के जाणवले.

रशिया : जगभर कोरोनाची दहशत पसरलेली असतानाच रशियाला भूकंपाचे धक्के बसले आहेत. रशियाचा फार ईस्ट भाग बुधवारी ७.२ रिश्टर स्केल तीव्रेतच्या भूकंपाच्या धक्क्याने हादरला. या भूकंपाच्या धक्क्यामुळे सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. कुर्ली बेटापासून भूकंपाचा केंद्रबिंदू जवळ आहे. रशियाच्या स्थानिकवेळेनुसार बुधवारी दुपारी हे भूकंपाचे धक्के जाणवले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या भूकंपामुळे कुठेही जिवित किंवा वित्तहानी झाली नाही. रशियाच्या फार ईस्ट भागापासून ५,६०० किमी अंतरावर असलेल्या हवाईमध्ये सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. रशियाच्या साखालीन भागातील सिव्हीरो क्युरीलस्क जिल्ह्यासाठी हा सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सिव्हीरो क्युरीलस्क एक छोटेस शहर असून, याची लोकसंख्या २५०० आहे. आधी हा भूकंप ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा असल्याचे सांगण्यात आले होते. पण रशियाच्या केंद्राने हा भूकंप ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा असल्याचे सांगितले. आधीच जगासमोर करोनाचे संकट असताना आता सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 7.5-magnitude earthquake hit off Russia’s Kuril Islands

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: