अमेरिकेने जपानवर अणुबाँब टाकल्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण

Hiroshima-and-Nagasaki
Hiroshima-and-Nagasaki

अमेरिकेने जपानवर अणुबाँब टाकल्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाली. या स्फोटांमुळे झालेल्या मानवी हानीची प्रचंडता हादरवून टाकणारी होती. या धक्क्यामुळेच त्या अणुबाँबपेक्षाही भयानक अस्त्रे निर्माण झाली असली तरीही त्यांचा वापर न करण्याचे तारतम्य सर्वच देशांनी दाखवले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हिरोशिमा - ६ ऑगस्ट, १९४५, सकाळी ८.१५

  • हिरोशिमा शहराच्या वर ६०० मीटरवर ‘लिटल बॉय’ अणुबाँबचा स्फोट. ७० हजार जणांचा तत्काळ मृत्यू.
  • शहरातील ९० टक्के भागाचा सफाया
  • स्फोटाचा थेट परिणाम म्हणून एकूण १,४०,००० जणांचा मृत्यू.
  • युरेनियमचा एक कण इतर कणांवर आदळवला गेला.

लिटल बॉय
उंची : ३ मी.
बाँबचा प्रकार
युरेनियम बाँब, १३ ते १६ किलोटन टीएनटी इतकी क्षमता

नागासाकी - ९ ऑगस्ट, १९४५, सकाळी ११.०२

  • नागासाकी शहराच्या वर ५०० मीटरवर ‘फॅट मॅन’चा स्फोट. ७४ हजार जणांचा तत्काळ मृत्यू.
  • बाँबमधील घटकाच्या बाह्य आवरणाचा दाब वाढून प्लुटोनियमच्या केंद्रकाचा स्फोट.

फॅट  मॅन
उंची : ३.२५मी.
बाँबचा प्रकार
प्लुटोनियम बाँब, १९ ते २२ किलोटन टीएनटी इतकी क्षमता 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com