Climate Change : जगभरातील धान्य उत्पादन घटलं; २०५० पर्यंत पृथ्वीवरील ९० कोटी लोकांवर येणार उपासमारीची वेळ, रिसर्चमध्ये दावा

ही आपल्यासाठी एक धोक्याची घंटा आहे.
Climate Change
Climate ChangeeSakal

हवामानात होत असणाऱ्या बदलांमुळे जगभरातील धान्य उत्पादन घटलं आहे. जागतिक तापमानवाढीचा गंभीर परिणाम आता दिसून येत आहे. या गोष्टीला आपण अजूनही हव्या तितक्या गांभीर्याने घेत नसल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ साली जगभरात ८२.८ कोटी लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. या शतकाच्या मध्यापर्यंत ही संख्या आणखी वाढू शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. कोलंबिया विद्यापीठ आणि जर्मन काउन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स या संस्थेने संयुक्तपणे यावर रिसर्च केला.

Climate Change
Japan Rain : जपानमध्ये पावसाचं थैमान! ३.७० लाख लोकांना घर सोडण्याचं आवाहन, २० नद्यांना महापूर

या संशोधनातील प्रमुख रिसर्चर काई कॉर्नह्यूबर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. त्यांनी जागतिक तापमानवाढीचे पिकांवर काय परिणाम होऊ शकतात याबाबत अभ्यास केला. यात त्यांनी १९६० ते २०१४ मधील आकडेवारी पाहिली, आणि २०४५ ते २०९९ पर्यंतची जलवायू मॉडेलची आकडेवारी यांचा अभ्यास केला. या सालापर्यंत जगभरातील ९० कोटी लोकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, असं यात दिसून आलं.

यामध्ये सर्वात आधी हवेतील जेट स्ट्रीमचा अभ्यास करण्यात आला. जेट स्ट्रीम हे हवेचे अतिप्रचंड वेगाने वाहणारे प्रवाह असतात. जगभरातील अनेक महत्त्वाच्या पीक-उत्पादक क्षेत्रांवर या प्रवाहांचा विपरित परिणाम होतो. अमेरिका, पूर्व युरोप, पूर्व आशियातील प्रमुख कृषी क्षेत्रांमधील उत्पादनात यामुळे सातत्याने घट होत आहे.

Climate Change
Unicef : संघर्षांमध्ये बळी बालहक्कांचा !

अचूक अंदाज लावणे कठीण

यावेळी हेदेखील तपासण्यात आलं, की कम्प्युटरच्या मदतीने भविष्यातील या धोक्यांचा अंदाज लावणे कितपत शक्य आहे. यामध्ये असं दिसून आलं, की हवामान बदलाचा जेवढा अंदाज कम्प्युटरने वर्तवला होता, त्यापेक्षा अधिक नुकसान सध्या पृथ्वीचं झालं आहे. याचाच अर्थ, भविष्यातील जे अंदाज वर्तवण्यात आले आहेत, ते अपेक्षेपेक्षा अधिक गंभीर असू शकतात. ही आपल्यासाठी एक धोक्याची घंटा आहे.

तातडीने कारवाई गरजेची

यामुळेच, तातडीने यासंबंधी हालचाल करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. सध्याचे तंत्रज्ञान ज्या संकटांचा अंदाज बांधू शकत नाही, त्यासाठी देखील आपण तयार राहणे गरजेचे आहे. अन्यथा जगातील सर्वच सजीवांवर याचे गंभीर दुष्परिणाम पाहायला मिळतील असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.

Climate Change
Joe Biden: अमेरिकेकडून रासायनिक शस्त्रांचा शेवटचा साठा नष्ट, बायडेन यांची घोषणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com