Old Tree In England : इंग्लंडमधील 200 वर्षे जुने झाड तोडले अन् सुरू झाला राडा, काय होतं असं विशेष?

ब्रिटनमध्ये 200 वर्षे जुने झाड उन्मळून पडले आहे
Old Tree In England
Old Tree In Englandesakal

Old Tree In England : ब्रिटनमध्ये 200 वर्षे जुने झाड उन्मळून पडले आहे. या झाडाचे नाव सायकॅमोर गॅप आहे. या झाडात एवढं विशेष काय आहे की हे झाड पडल्यामुळे ब्रिटनमध्ये एवढा गोंधळ निर्माण झालाय. हे झाड सोशल मीडियावर देख चर्चेचा विषय बनला आहे.

Old Tree In England
Relationship Tips : खरं प्रेम दिवा घेऊन शोधलतं तरी सापडणार नाही? असं तुम्हालाही वाटत असेल, तर या टिप्स आजमावून पहाच

ब्रिटनमध्ये 200 वर्ष जुनं झाड पडलं आहे. या झाडाचं नाव आहे सायकॅमोर गॅप. या घटनेने ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी 16 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. हे झाड युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ हॅड्रियनच्या भिंतीजवळ होतं, ज्याला रोमन शासक हॅड्रियन याच्या नावावरून नाव देण्यात आलंय. या झाडाचं नेमकं वय किती हे कोणालाच ठाऊक नाही. मात्र हे झाड 200 ते 300 वर्ष जुने असल्याचं बातम्यांमध्ये सांगितलं जातंय.अशा परिस्थितीत या झाडाचं इतकं महत्व काय होतं की, ब्रिटनमध्ये खळबळ उडाली? सोशल मीडियावर तो चर्चेचा विषय बनला ?

Old Tree In England
Weight Loss Tips : वजन झटक्यात कमी होईल, फक्त हा एक पदार्थ खाण्याची सवय लावून घ्या

रॉबिन हूडचे झाड?

केविन कॉस्टनरच्या 1991 च्या रॉबिन हूड चित्रपटात हे झाड दाखवण्यात आलं होतं, म्हणून याला रॉबिन हूड ट्री असंही म्हणतात. शेकडो वर्षे जुने असल्याने हे झाड ब्रिटनमधील पर्यटनस्थळही बनले होते. येथून जाणारे लोक या झाडासोबत सेल्फी काढत असत.मेट्रोच्या अहवालानुसार, नॉर्थम्बरलँड नॅशनल पार्क आणि नॅशनल ट्रस्ट गेल्या अनेक वर्षांपासून या झाडाची देखभाल करत आहे. 2016 मध्ये त्याला इंग्लिश ट्री ऑफ द इयर घोषित करण्यात आले.

Old Tree In England
Vastu Tips: रात्री झोपण्यापूर्वी महिलांनी या गोष्टी नक्की कराव्यात, सुख-समृद्धी वाढून भरभराट होईल

झाड पडले की तोडले?

200 वर्षे जुने झाड पडले की जाणीवपूर्वक तोडण्यात आले, असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. रात्री उशिरा आलेल्या वादळानंतर हे झाड पडल्याचा दावा ब्रिटिश मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. तर एएफपीच्या अहवालात असे म्हटले होते की झाडाच्या आजूबाजूला पांढऱ्या रंगाच्या खुणा दिसत होत्या आणि ते साखळीने कापल्यासारखे वाटत होते. नॉर्थम्बरलँड नॅशनल पार्क ऑथॉरिटीने गुरुवारी हे झाड मुद्दाम कापले गेल्याची पुष्टी केली आहे. ब्रिटनचे हे झाड जगभर प्रसिद्ध आहे. हे झाड पाडण्याच्या संशयावरून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

Old Tree In England
Tech Tips : आता रिमोट घेण्यासाठी जागेवरून उठायची गरज नाही, मोबाईललाच बनवा TV चा रिमोट

हे झाड पुन्हा वाढणार का? यावर नॅशनल ट्रस्टचे म्हणणे आहे की, आम्ही बिया आणि त्याच्या फांद्या एकत्र करून झाडाचा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न करू. पण ते जुन्या झाडासारखे होऊ शकणार नाही. हे झाड पडल्यानंतर सोशल मीडियावर लोक दुःख व्यक्त करत आहेतबऱ्याच लोकांनी झाडाशी संबंधित आपल्या आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. यासोबतच कितीही प्रयत्न केले तरी असे झाड पुन्हा वाढणे अवघड असल्याचेही बोलले जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची चौकशी सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com