
धक्कादायक! जन्मदात्या पित्याने तीन मुलांवर झाडल्या गोळ्या; स्वत:ही केली आत्महत्या
कॅलिफोर्नियातील (California) सॅक्रामेंटोच्या एका चर्चमध्ये पित्याने त्याच्या तीन मुलांवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आणि त्याहुन भयावह म्हणजे त्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या केली. या घटनेने परीसरात खळबळ उडाली.
हत्या करण्यात आलेली तिन्ही मुले ही १५ वर्षाखालील होती. या घटनेविषयी पोलिसांनी माहिती दिली. ही घटना घरघुती हिंसाचारातुन झाल्याचा पोलीसांचा प्राथमिक अंदाज आहे. सॅक्रामेंटो (Sacramento)) येथे आणखी एका व्यक्तीचाही मृत्यू झाला तरी ती व्यक्ती या घटनेशी संबंधित होती की नाही हे अद्याप पोलींसाकडुन स्पष्ट करण्यात आले नाही. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर यांनी त्यांच्या ट्विटर पोस्टमध्ये या हत्येला मूर्खपणा म्हटले.
कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर ट्वीटद्वारे म्हणाले, “हे एक मूर्खपणाचे कृत्य आहे. आमच्या संवेदना पीडित,त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या समुदायांसोबत आहे.आम्ही स्थानिक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी काम करत आहोत”