
ब्यूनॉस आयर्स : अर्जेंटिनातील भारतीय जनसमूहाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जल्लोषात स्वागत केले. अर्जेंटिनाच्या रस्त्यांवर स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी सायंकाळी ‘मोदी-मोदी’, ‘जय हिंद’चा गजर घुमत होता. देशापासून हजारो किलोमीटर दूर झालेल्या या स्वागताने भारावून गेल्याची भावना मोदी यांनी व्यक्त केली.