France Attack: फ्रान्समध्ये धार्मिक घोषणा देत शिक्षिकेची हत्या; मॅक्रॉन म्हणाले 'आम्ही झुकणार नाही'

France Attack
France Attack

पॅरिस- इस्राइल आणि हमासमध्ये युद्ध सुरु आहे. त्यातच फ्रान्सच्या अरास शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका तरुणाने शाळेतील शिक्षिकेवर 'अल्लाह हू अकबर'ची घोषणा देत चाकू हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेमध्येच हा प्रकार घडला असून यात दोन जण जखमी झाले आहेत. हिंदूस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (A knifeman fatally stabbed teacher and wounded another in an attack at a school in the northern France city of Arras )

फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यनुएल मॅक्रॉन यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केलाय. या हल्ल्याला इस्लामी दहशतवाद म्हणत याची निंदा केली आहे. फ्रान्समधील एका मंत्र्याच्या माहितीनुसार देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. इस्राइल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्याकडे पाहिलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून फान्समध्ये पॅलेस्टिनी समर्थकांकडून निदर्शनं करण्यात येत आहेत.

France Attack
Hamas Commander : 'इस्राइल तर सुरुवात आहे.. संपूर्ण जगावर आमचं राज्य असेल', हमासच्या कमांडरचं वक्तव्य; पाहा व्हिडिओ

मॅक्रॉन यांनी शाळेत जाऊत शिक्षिका डोमिनिक बर्नार्ड यांना श्रद्धांजली वाहिली. आरोपीने महिलेवर हल्ला केला तसेच त्याने दुसऱ्या दोघांना जखमी केले आहे. मॅक्रॉन म्हणाले की, 'शिक्षिकेने घेतलेल्या पुढाकारामुळे अनेकांचा जीव वाचला. आम्ही दहशतवादासमोर झुकणार नाही. अशा प्रकारचे हल्ले किंवा कृत्य आम्हाला विभाजित करु शकत नाही.'

दोन दिवसांपूर्वी मॅक्रॉन यांनी फ्रान्सच्या जनतेला इस्राइल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर एकजुट राहण्याचे आवाहन केले होते. तसेच इस्राइल-हमास युद्धावर कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचं सांगितलं होतं.

आरोपीचे नाव मोहम्मद असल्याचं कळतंय. त्याला अटक करण्यात आलीये. तो लीसी गॅम्बेटा हाय स्कूलचा माजी विद्यार्थी आहे. त्याने आपल्याच शाळेत हल्ला केला असून याप्रकरणी दहशतवाद प्रतिबंधक एजेन्सीकडून चौकशी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीच्या एका भावाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. भावाला यापूर्वी इस्लामी दहशतवादाशी संबंध ठेवल्याप्रकरणी अटक झाली होती.

France Attack
Israel War : इस्राइल-हमास युद्धादरम्यान 'एक्स'ची मोठी कारवाई; चुकीची माहिती पोस्ट करणारे शेकडो अकाउंट्स ब्लॉक

पोलिसांच्या माहितीनुसार, अनेकांनी हल्लेखोराला अल्लाह हू अकबर ची घोषणा देताना ऐकलं आहे. आरोपीचे फोन टॅपिंग केले जात होते. त्याने काही संदिग्ध व्यवहार केले होते. पण, अशा प्रकारच्या हल्ल्याचे कोणतेही संकेत मिळाले नव्हते. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com