Israel–Hamas war: इस्राइल-हमास संघर्षाला गंभीर वळण? इस्लामिक राष्ट्रांची 'तातडीची महत्त्वाची बैठक' सौदीत

Israel–Hamas war
Israel–Hamas war

नवी दिल्ली- इस्राइल-हमास संघर्षाचा आज आठवा दिवस आहे. संघर्षाचा भडका उडाला असून तो तूर्तास थांबण्याची चिन्ह नाहीत. त्यातच एक मोठी अपडेट समोर येत आहे. इस्लामिक देशांच्या गटाने 'तातडीची असामान्य बैठक' बोलावली आहे.

सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरामध्ये बुधवारी या बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. द ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनने (OIC) लष्करी संघर्ष आणि गाझातील नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी चर्चेसाठी ही बैठक बोलावली आहे.

सौदी अरेबिया या बैठकीचे नेतृत्व करत आहे. सौदी अरेबियानेच सर्व इस्लामिक राष्ट्रांना यासंदर्भातील निमंत्रण पाठवले आहे. (A top grouping of Islamic nations OIC has called an urgent extraordinary meeting in Saudi Arabia to discuss the Israel Gaza war)

Israel–Hamas war
Gold Rate: इस्राइल-पॅलेस्टाईन युद्धामुळे सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार? काय सांगतात तज्ञ

OIC ने आपल्या वेबसाईटमध्ये म्हटलंय की, 'मध्य पूर्वेतील परिस्थिती गंभीर आहे. नागरिकांचा जीव धोक्यात आला असून क्षेत्राची सुरक्षितता आणि शांतता महत्त्वाची आहे. त्यामुळे मंत्रीस्तरावरील तातडीची महत्त्वाची बैठक बोलवण्यात येत आहे.'

जगातील दुसरी मोठी संघटना

संयुक्त राष्ट्रानंतर OIC ही सर्वात मोठी संघटना आहे. या संघटनेत ५७ सदस्य देश आहेत. जगभरातील मुस्लिमांचा आवाज उठवणारी म्हणून या संघटेनी ओळख आहे. सौदी अरेबियाने इस्राइलसोबचे संबंध सुधारण्यासाठी सुरु केलेली चर्चा थांबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व जगाचे या बैठकीकडे लक्ष असणार आहे.

Israel–Hamas war
Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

हमासने ७ ऑक्टोबरला इस्राइलवर अनपेक्षित हल्ला केला. त्यामुळे आतापर्यंत १३०० लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर इस्राइलने प्रतिहल्ला सुरु केला. मोठ्या प्रमाणात गाझावर बॉम्बवर्षाव करण्यात आला. यात आतापर्यंत २२१५ लोकांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. अनेक जण जखमी झाले आहेत. संघर्ष सुरुच असल्याने जीवितहानी वाढण्याची शक्यता आहे.

Israel–Hamas war
Israel-Hamas conflict: इस्राइल-हमास संघर्षामुळे रशियाला मोठी संधी? पुतिन यांच्या डोक्यात शिजतोय प्लॅन!

सौदी अरेबियाने इस्राइल सोबतचे संबंध संपवले?

इस्राइलला अमेरिकेने भक्कम पाठिंबा दिला आहे. तसेच इस्राइलला आपले संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं म्हटलं आहे. दुसऱ्या बाजूला आता पॅलेस्टाईनच्या समर्थनात इस्लामी देश येत असल्याचं दिसतंय. सौदीने नुकतेच इस्राइलसोबत संबंध पुढे न नेण्याचा निर्णय घेतला असून तसे अमेरिकेला कळवले आहे. त्यामुळे बोलावण्यात आलेल्या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहावं लागेल. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com