अफगाण अधिकारी पाकमध्ये दाखल

एपी
Tuesday, 29 September 2020

पाक परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार अब्दुल्लाह यांच्या भेटीमुळे शांतता चर्चेबद्दल विचारांची देवाणघेवाण होईल. याशिवाय उभय देशांमधील संबंध आणि जनतेमधील संवाद भक्कम होईल.

इस्लामाबाद  - तालीबानबरोबरील वाटाघाटींसाठी अफगाणिस्तान सरकारने नेमलेले एक मुख्य अधिकारी अब्दुल्लाह अब्दुल्लाह यांचे सोमवारी पाकिस्तानमध्ये आगमन झाले. तीन दिवसांच्या दौऱ्यात ते पंतप्रधान इम्रान खान तसेच सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.

विमानतळावर प्रमुख सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. ते अफगाण राष्ट्रीय सलोखा उच्च मंडळाचे प्रमुख आहेत. अध्यक्ष अरीफ अल्वी, परराष्ट्र मंत्री शान मेहमूद कुरेशी तसेच इतर अधिकाऱ्यांनाही ते भेटतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कतारमध्ये 12 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या चर्चेत अफगाणिस्तान सरकारचे प्रतिनिधित्व हे मंडळ करीत आहे. 2001 मध्ये अमेरिकेने हल्ला केल्यानंतर तालिबान सरकार पाडण्यात आले. त्यानंतर अफगाणिस्तानला युद्धाने ग्रासले आहे. हा संघर्ष संपविण्याच्या उद्देशाने आतापर्यंत झालेला हा सर्वाधिक गांभीर्याचा प्रयत्न मानला जात आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उभय संबंधांचा मुद्दा 
पाक परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार अब्दुल्लाह यांच्या भेटीमुळे शांतता चर्चेबद्दल विचारांची देवाणघेवाण होईल. याशिवाय उभय देशांमधील संबंध आणि जनतेमधील संवाद भक्कम होईल. अफगाण जनतेसाठी शांतता, स्थैर्य निर्माण करण्याच्या आणि त्यांची भरभराट होण्याच्या सर्व प्रयत्नांना पाकचा संपूर्ण पाठिंबा आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इतिहास मात्र असा
1980च्या दशकापासून अनेक तालिबान नेते पाकिस्तानमध्ये राहिले आहेत. तेव्हा ते अफगाण मुजाहिदीन बंडखोरांचा भाग मानले जायचे.
सोव्हिएत महासंघाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी याच बंडखोरांनी अमेरिकेला साथ दिली होती.

   इम्रान यांचा दावा
तालिबानच्या सदस्यांची 2001 मध्ये हकालपट्टी झाली. त्यानंतर पाकने त्यांना आश्रय दिल्याचा आरोप अमेरिका तसेच अफगाणिस्तानने वारंवार केला आहे. आयएसआयशी तालिबानचे दीर्घ काळापासून संबंध असल्याचा या देशांचा दावा आहे. इम्रान यांनी मात्र हा तो फेटाळून लावला आहे. तालिबान-अफगाणिस्तान शांतता चर्चेचा मार्ग आपल्या सरकारने सुकर केल्याचा इम्रान यांचा दावा असून आता या संधीचा फायदा उठविणे अफगाणिस्तान-च्या हातात असल्याचे ते सांगतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abdullah Abdullah meet Prime Minister Imran Khan