शरीफ यांच्यासाठी कारागृहात एसी, टीव्ही आणि बरंच काही !

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जुलै 2018

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली शिक्षा झालेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मर्यम यांनी अटक झाल्यानंतर त्यांनी काल ता.(13) पहिला दिवस कारागृहात घालवला. रावळपिंडीतील अडायला कारागृहात त्यांची काल (ता.13) रवानगी करण्यात आली होती. पहिल्या दिवशी त्यांची रवानगी कारागृहात केल्यानंतर स्वखर्चातून कारागृहात एसी, टीव्ही आणि अशा प्रकारच्या अनेक सुविधा त्यांनी उपलब्ध केल्या होत्या. कारागृहाच्या अहवालातही कैदी स्वखर्चातून अशा सुविधा उपलब्ध करू शकत असल्याचे म्हटले आहे.

रावळपिंडी - भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली शिक्षा झालेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मर्यम यांनी अटक झाल्यानंतर त्यांनी काल ता.(13) पहिला दिवस कारागृहात घालवला. रावळपिंडीतील अडायला कारागृहात त्यांची काल (ता.13) रवानगी करण्यात आली होती. पहिल्या दिवशी त्यांची रवानगी कारागृहात केल्यानंतर स्वखर्चातून कारागृहात एसी, टीव्ही आणि अशा प्रकारच्या अनेक सुविधा त्यांनी उपलब्ध केल्या होत्या. कारागृहाच्या अहवालातही कैदी स्वखर्चातून अशा सुविधा उपलब्ध करू शकत असल्याचे म्हटले आहे.

काल नवाज शरीफ (वय 68) यांच्याबरोबर, त्यांची कन्या मरियम (वय 44) यांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या तपास संस्थेने त्यांचे पासपोर्टही जप्त केले आहेत. पाकिस्तानमध्ये 25 जुलैला सार्वत्रिक निवडणूक असल्याच्या पार्श्‍वभूमीवर या घटनेकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे.

शरीफ आणि मरीयम नवाज यांना अनुक्रमे 10 व 7 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. पनामाच्या कागदपत्रांमध्ये गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांना अपात्र ठरविले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AC Television And More Sharifs Qualify For Class In Pak Jail