आठवड्याला 50 लाख भाडं; कोरोना लस बनवणाऱ्या पूनावालांनी लंडनमध्ये घेतलं महागडं घर

adar.
adar.

लंडन : कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरु झाल्यानंतर कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीची निर्मिती करण्याची तयारी दाखवणारे सीरम इन्स्टिस्टूट चर्चेत आले. सीरमचे सीईओ आदर पूनावाला हे सध्या सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रकाशझोतात आहेत. सध्या आदर पूनावाला आणखी एका कारणामुळे चर्चेत आले आहेत. मात्र, आताच हे चर्चेचं कारण कोरोना लसीसंदर्भातील नाहीये, तर त्यांच्या घराविषयी आहे. कोरोना व्हायरसवर प्रतिबंधात्मक लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी लंडनमध्ये एक घर भाड्याने घेतलं आहे. त्यांनी घेतलेलं हे घर आणि त्याचं भाडं ऐकून आपण नक्कीच थक्क व्हाल. आदर पूनावाला या भाड्याच्या घरासाठी 50 हजार पाउंड म्हणजेच जवळपास 50 लाख रुपये इतकं भाडं देणार आहेत. विशेष म्हणजे हे भाडं काही महिन्याचं भाडं नाहीये तर आठवड्याचं आहे. त्यांनी भाड्याने घेतलेली ही प्रॉपर्टी लंडनमधील पॉश मेफेअर भागातील आहे. फक्त लंडनच नव्हे तर जगातील सर्वाधिक महागड्या अशा भागापैंकी एक असा हा भाग आहे, जिथे आदर पूनावालांनी हे घर घेतलं आहे.

किती आहे जागा
न्यूज एजन्सी ब्लूमबर्ग यांनी सूत्रांकडून हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार म्हटलंय की, पूनावाला यांनी पोलंडचे अब्जाधीश उद्योगपती डोमिनिका कुलझेक यांच्याकडून ही प्रॉपर्टी घेतली आहे. जवळपास 25 हजार स्क्वेअर फूटची ही प्रॉपर्टी त्या भागातील सर्वांत मोठी जागा आहे. एवढ्या जागेत ब्रिटीश लोकांची सरासरी 24 घरे येतात. 

पूनावाला यांच्या कंपनीने AstraZeneca सोबत टाय-अप करुन कोरोना लसीची निर्मिती केली आहे. त्यांचं नेहमीच ब्रिटनमध्ये येणंजाणं असतं. तसेच त्यांनी लंडनच्या वेस्टमिनिस्टर युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतलं आहे. याआधी त्यांनी मेफेअरच्या ग्रॉसवेनोर हॉटेल खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ते अयशस्वी ठरले. त्यांचं कुटुंब आता जगातील मोठ्या अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहे. Bloomberg Billionaires Index च्या म्हणण्यानुसार त्यांच्या कुटुंबियांची एकूण प्रॉपर्टी 15 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 1,08,993 कोटी रुपये आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com