

Afghanistan Launches Airstrike Inside Pakistan, Military Bases Targeted Amid Rising Tensions
esakal
दक्षिण आशियातील राजकीय वातावरणात मोठी उलथापालथ होत असताना, अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जोरदार हवाई कारवाई केली आहे. इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने या कारवाईची माहिती देताना सांगितले की, त्यांच्या हवाई दलाने पाकिस्तानी प्रदेशात खोलवर प्रवेश करून अनेक महत्त्वाच्या लष्करी केंद्रांना उद्ध्वस्त केले. या घटनेमुळे दोन्ही राष्ट्रांमधील संबंध अधिकच बिघडले असून, मोठ्या युद्धाची भीती व्यक्त होत आहे.