Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात २० जण ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Afghanistan

Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात २० जण ठार

अफगाणिस्तानमध्ये मोठी घटना घडल्याची माहिती मसोर आली आहे. तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर बॉम्बस्फोट घडवण्यात आला. यामध्ये जवळपास २१ ठार तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Afghanistan Bomb blast near Foreign Ministry in Kabul several people killed )

काही स्थानिक माध्यमांनी असेही वृत्त दिले की तालिबान आणि चिनी अधिकाऱ्यांमध्ये बैठक सुरू असताना परराष्ट्र मंत्रालयाच्या गेटजवळ मोठा स्फोट झाला. एका ट्विटमध्ये, काबूल सुरक्षा विभागाचे प्रवक्ते खालिद जद्रान यांनी या घटनेची पुष्टी केली आणि त्यात घातपात झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

"आज 4 वाजण्याच्या सुमारास परराष्ट्र मंत्रालयाच्या रस्त्यावर स्फोट झाला, ज्यात दुर्दैवाने जीवितहानी झाली. सुरक्षा पथके परिसरात पोहोचली आहेत, आणि घटनेची माहिती घेतली," असे त्यांनी ट्विट म्हटले आहे.