
नवी दिल्लीः अफगाणिस्तानच्या हेलमंद प्रांतात एका ४५ वर्षीय व्यक्तीने एका ६ वर्षीय चिमुरडीशी लग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर वधूच्या वेशात असलेल्या मुलीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांचा संताप अनावर झाला आहे. मुलीच्या वडिलांनी पैशांसाठी तिला विकले आणि त्यानंतर ४५ वर्षीय व्यक्तीने तिच्याशी जबरदस्तीने लग्न केले. तालिबान सरकारच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, मुलगी ९ वर्षांची झाल्यावरच तिला तिच्या पतीच्या घरी पाठवता येईल.