काबुलच्या आकाशात एअर इंडियाच्या विमानाने अनुभवले तणावाचे क्षण

काबुलहून एअर इंडियाचं विमानं १२९ प्रवाशांना घेऊन मायदेशी दाखल झालं. खरंतर या विमानाचा काबूलपर्यंतचा प्रवास सहज झाला नाही.
air india plane
air india plane

काबूल: अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान राज (Afganistan taliban) येणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तेथील परिस्थिती वेगाने बदलली आहे. हजारो नागरिकांनी देशाबाहेर जाण्यासाठी काबूल विमानतळावर (kabul airport) धाव घेतली आहे. काल काबुलहून एअर इंडियाचं विमानं (Air india plane) १२९ प्रवाशांना घेऊन मायदेशी दाखल झालं. खरंतर या विमानाचा काबूलपर्यंतचा प्रवास सहज झाला नाही. अफगाणिस्तानात सुरु असलेला सत्तासंघर्ष, तणावाचा (Tense moment) फटका या विमानाला बसला.

दिल्ली-काबूल या एअर इंडियाच्या नियोजित विमानाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन ठरलेल्या वेळेला उड्डाण केले. पण काबुलमध्ये लँडिंग करण्यापूर्वी अफगाणिस्तानातील परिस्थिती नाटयमय रित्या बदलली होती. २ तास २० मिनिटांचा प्रवास केलेल्या या विमानाला काबुलच्या आकाशात आणखी तासभर घिरट्या घालाव्या लागल्या.

air india plane
VIDEO: काबूल विमानतळावर गोळीबार, पाहा भयावह स्थिती

एअर इंडियाचे हे विमान अफगाणिस्तानात दाखल झालं, त्यावेळी तालिबानी दहशतवादी काबुलच्या हद्दीपर्यंत पोहोचले होते आणि काबुलच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षामध्ये (ATC) एअर इंडिया फ्लाईट २४३ ला लँडिंगसाठी मदत करायला कोणी उपलब्ध नव्हते. काबुलच्या हवाई हद्दीत तणावाचे हे क्षण अनुभवल्यानंतर तासाभराने या विमानाने लँडिंग केले.

air india plane
Afghanistan Crisis : काबूल विमानतळ अमेरिकेच्या ताब्यात

काबुलमधील भारतीय दूतावासातील राजनैतिक आणि सुरक्षा अधिकाऱ्यांन मायदेशी आणण्यासाठी हे विमान पाठवण्यात आले होते. कंदहार आणि मझार-ए-शरीफमधील भारतीय दूतावास स्थानिक कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहेत. तिथे काम करणाऱ्या भारतीयांना विशेष विमानाने सुरक्षितरित्या मायदेशी आणले जात आहे. कंदहार आणि मझार-ए-शरीफ ही अफगाणिस्तानातील दोन मोठी शहर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com