अफगाणिस्तानावर मोठे संकट ; परराष्ट्र मंत्र्यांनी मालमत्ता मुक्तीची अमेरिकेकडे केली मागणी : Aganistan Humanitarian Crisis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Afghanistan

अफगाणिस्तानमधील तीव्र आर्थिक आणि मानवतावादी संकटाचा दाखला देत मुत्तकी यांनी अमेरिकन काँग्रेसला पत्र लिहले.

अफगाणवर संकट ; परराष्ट्र मंत्र्यांनी मालमत्ता मुक्तीची अमेरिकेकडे केली मागणी

टोलोन्यूजच्या वृत्तानुसार, मुत्ताकी यांनी सांगितले की, अमेरिका आता अफगाणिस्तान सोबतच्या युद्धात सहभागी नाही. अफगानची संपत्ती गोठवण्याचे कोणतेही कारण नाही. अशावेळी संपत्ती गोठवण्याचे कारण काय ? हि संपत्ती इस्लामिक अमिरातीची नसून अफगाणिस्तानातील लोकांची आहे. अमेरिकेने आमची मालमत्ता आधीच काढून घेतली आणि आता आम्हाला मानवीय सहायता देणार. याचा अर्थ काय आहे?

काही तज्ञांचे असे मत आहे की, अफगाणिस्तानची मालमत्ता गोठवल्याने अफगाणिस्तानच्या लोकांना आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. सध्या थंडीचा हंगाम सुरू असल्याने लोकांची अतिशय वाईट परिस्थितीचा आहे. मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. जगाने अफगाणिस्तानातील लोकांचा विचार केला पाहिजे. असे राजकीय विश्लेषक तझर कक्कर यांनी सांगितले.

दरम्यान,अफगाणिस्तानमधील तीव्र आर्थिक आणि मानवतावादी संकटाचा दाखला देत मुत्तकी यांनी अमेरिकन काँग्रेसला एक पत्र लिहून अफगाण मालमत्ता मुक्त करण्याचे आवाहन केले होते. या पत्राला उत्तर देताना अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी थॉमस वेस्ट म्हणाले की, तालिबानने त्यांच्या पत्रात देशाच्या आर्थिक आणि मानवतावादी संकटाबाबत खोटी तथ्ये मांडली आहेत.

अफगाणिस्तानात मानवतावादी संकट अधिक गडद झाले आहे. तालिबानने देशाचा ताबा घेतल्यापासून अफगाणिस्तानातील मानवतावादी परिस्थिती तसेच सुरक्षा स्थितीही खालावत चालली आहे. अफगाणिस्तानला तात्काळ मानवतावादी मदत न दिल्यास या हिवाळ्यात लाखो अफगाण नागरिकांना उपासमारीचा सामना करावा लागेल. असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रम (WFP)ने दिला आहे.

डब्लूएफपीच्या मते, परिस्थिती लवकर सुधारली नाही तर,अफगाणिस्तानच्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येला पुढील वर्षी मार्चपर्यंत अन्न असुरक्षिततेच्या आपत्कालीन परीस्थितीची सामना करावा लागू शकतो.

loading image
go to top