esakal | अफगाणिस्तानात मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट, ५० जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Afghanistan

अफगाणिस्तानात मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट, ५० जणांचा मृत्यू

sakal_logo
By
सुधीर काकडे

अफगाणिस्तानच्या कुंडुझ शहरातील शिया मशिदीमध्ये आज मोठा बॉम्ब हल्ला झाला. या हल्ल्यात 50 लोक ठार झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अमेरिकन सैन्याने देश सोडल्यापासून झालेल्या आता पर्यंतच्या हल्ल्यांमधील हा एक मोठा हल्ला आहे. अफगाणिस्तानला तालिबानच्या ताब्यात आल्यानंतर होणाऱ्या वेगवेळ्या हल्यांमुळे अफगाणिस्तान दिवसेंदिवस अस्थिर होत जात असल्याचे दिसते आहे.

कुंदुज रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, आता पर्यंत ५० पेक्षा जास्त जखमींना रुग्णालया आणण्यात आले असून, ३५ लोकांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टर्स विदाउट बॉर्डर रुग्णालयातील एका कामगाराने 15 मृत आणि अनेक जखमी रुग्णालयात भरती झाल्याची माहिती दिली आहे. वेगवेळ्या वृत्त संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील मृतांचा आकडा १०० वर जाण्याची शक्यता आहे.

"आमच्या शिया बांधवांच्या मशिदीत स्फोट झाला आणि त्यात अनेकजण मारले गेले." अशी माहिती तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी देखील दिली आहे." अद्यापपर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणी स्वीकारली नसली तरी, तालिबानचा कट्टर प्रतिस्पर्धी इस्लामिक स्टेट गटाने हा हल्ला केला असल्याची शक्यता आहे.

loading image
go to top