

Afghanistan Pakistan War
Esakal
Pakistan Afghanistan 'war' LIVE: अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमावादाने भीषण युद्धाचे रूप घेतले आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानी सैन्याविरुद्ध मोठा हल्ला करून ५५ सैनिकांना ठार मारल्याचा दावा केला असून, १५ सीमा चौक्या ताब्यात घेतल्याचे सांगितले आहे. या घटनेने पाकिस्तान हादरला आणि त्याने तत्काळ ‘ऑपरेशन गजब लिल हक’ सुरू करून अफगाणिस्तानच्या राजधानी काबुलसह पक्तिका व कंधार या शहरांवर मध्यरात्री हवाई हल्ले केले. पाकिस्तानचा दावा आहे की, या हल्ल्यात १३० हून अधिक अफगाण नागरिक आणि सैनिक ठार झाले आहेत.