आश्वासनावरुन तालिबानचा यू टर्न! सहावीनंतर मुलींना शाळेत नो एंट्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Taliban

आश्वासनावरुन तालिबानचा यू टर्न! सहावीनंतर मुलींना शाळेत नो एंट्री

काबूल : गेल्यावर्षी अफगाणिस्तानची सत्ता काबीज करणाऱ्या तालिबानने मुलींच्या शिक्षणात अडथळे न आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यावरून घूमजाव करत तालिबानने इयत्ता सहावीपुढील मुलींना शिक्षणसंस्थांत प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानातील नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी तालिबानच्या अधिकाऱ्याने यासंदर्भात अधिकृत स्पष्टीकरण दिले. (Taliban)

हेही वाचा: नाना पाटोलेंचा रश्मी शुक्लांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा; बदनामीचा आरोप

तालिबानच्या या निर्णयामुळे मुलींना शाळांचे दरवाजे खुले करण्यासह महिलांना सार्वजनिक ठिकाणी त्यांचे अधिकार बहाल करण्याचे आवाहन करणाऱ्या जागतिक समुदायाला धक्का बसला आहे. समुदायाने तालिबानच्या निर्णयाचा निषेध केला आहे. अफगाणिस्तानच्या शिक्षण मंत्रालयाने नुकतेच एक निवेदन जारी करून सर्व विद्यार्थ्यांना शाळेत येण्याचे आवाहनही केले होते. मात्र, शिक्षण मंत्रालयाकडून नव्या शैक्षणिक वर्षाची पूर्वतयारी केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर तालिबानने मंगळवारी(ता.२२) रात्री उशिरा हा अनपेक्षित निर्णय जाहीर केला.(Taliban)

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता पुन्हा काबीज केली होती. तेव्हापासून इयत्ता सहावीपुढील शिक्षण घेण्यास विद्यार्थिंनीवर बंदी घालण्यात आली. यावर्षी काही विद्यापीठेही सुरू झाली. परंतु, सत्ता काबीज केल्यापासून तालिबानचे आदेश अनिश्चित राहिले आहेत आणि अफगाणिस्तानातील मूठभर प्रांतांनी सर्वांना शिक्षण देणे सुरू ठेवले आहे. बहुतेक प्रांतातील शिक्षणसंस्थांनी मुली व महिलांसाठी आपले दरवाजे बंद केले आहेत. देशाची राजधानी काबूलमध्ये मात्र शाळा व विद्यापीठे कोणत्याही अडथळ्यांशिवाय सलगपणे सुरू आहेत. धार्मिक वृत्तीने चालणाऱ्या तालिबान प्रशासनाला इयत्ता सहावीपुढील मुलींची नोंदणी केल्याने त्यांचा आधार नष्ट होण्याची भीती आहे. (Taliban)

हेही वाचा: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न अस्तित्वातच नाही - CM बोम्मई

अफगाणिस्तानात इयत्ता सहावीपुढील मुलींना शिक्षणाची परवानगी कधी आणि कशी द्यायची, हेही तालिबान नेतृत्वाने अद्याप ठरविले नाही. तालिबानी नेतृत्व ते ठरविण्याचा प्रयत्न करत आहे. अफगाणिस्तानात सहावीपुढील मुलींसाठी ग्रामीण भागात विशेषत: आदिवासी पश्तुन प्रांतात मुलींच्या शिक्षणाला विरोध असला तरी शहरी भागात त्याला पाठिंबा आहे, असं अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री वाहीदुल्लाह हाश्मी यांनी म्हटलंय. (Taliban)

तालिबानने वचन पाळले नाही

अफगाणिस्तानच्या ग्रामीण भागात बहुतांश पालक मुलींना शाळेत पाठविण्यासाठी नाखूष असतात. त्यामुळे, मुलींना उच्च शिक्षण देण्याचा निर्णय पुढे ढकलून कट्टर तालिबानी चळवळीचा कणा असलेल्या ग्रामीण आणि आदिवासी भागाला खूष करण्याची खेळी तालिबानने खेळल्याचे दिसते. इस्लामिक पोशाखांचे संदर्भात आम्ही सांगितलेले ऐकल्यास मुलींना शाळांत जाऊ देण्याचे वचन तालिबानने दिले होते. मात्र, आता तालिबानने आपले पाळले नाही, असा आरोप अफगाणिस्तानातील स्थानिक पत्रकार मारियम नाहीबी यांनी केला. अफगाणिस्तानात महिलांच्या हक्कांसाठी नाहीबी यांनी आंदोलने केली आहेत.

Web Title: Afghanistan Taliban Backtrack On Reopening High Schools For Girls

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top