चीन सरकारच्या दबावाखाली व्यावसायिक साम्राज्यातून 'जैक मा' यांची माघार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jack ma

Jack ma: 2 वर्षा नंतर 'जॅक मा' दिसले युरोप मध्ये

चीन चे करोडपती जॅक मा गेल्या दोन वर्षापासुन सार्वजनिक जीवना पासुन लांबच राहिले होते, आता ते युरोप मध्ये सुट्टी घालवीत आहेत. ब्लूमबर्गच्या माहिती नुसार चीन सरकारचा दबाव 'जॅक मा' यांच्या वरून कमी झाले आहे.एके काळी, जॅक मा हे जगातील सर्वात वेगाने वाढणारी कंपनी अलीबाबाचे सह-संस्थापक आहेत.

पण चीन सरकारच्या दबावाखाली त्यांना आपल्या व्यावसायिक साम्राज्यातून माघार घ्यावी लागली. जॅक माची कंपनी अलीबाबा चीनमध्ये इतकी मोठी झाली होती की त्यांना चीनमधील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक मानले जात होते.

ब्लूमबर्ग आणि स्थानिक मीडियाच्या मते, "57 वर्षीच्या जॅक मा ऑस्ट्रियातील एका हॉटेल मध्ये दिसले आणि सेंद्रीय शेतीबद्दल माहिती घेण्यासाठी त्यांनी नेदरलँडमधील एका विद्यापीठाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी मॅलोर्का या स्पॅनिश बेटावर आपली जहाज लावली होती.

2020 मध्ये त्यांनी एक मोठी फिनटेक कंपनी एंट ग्रुप वर सक्ती करण्यासाठी कम्युनिस्ट पार्टीच्या अधिकाऱ्यांनी टीका केली होती. त्यानंतर मात्र जॅक मा यांचा चीनबाहेरचा हा पहिला दौरा नाही. चीन सरकार अनेक दिवसांपासून करोडपतीना देशाबाहेर जाऊ नका, असा सल्ला देत होते.यावर गुंतवणूकदारही त्याच्या कंपनीबद्दल अनेक शंका उपस्थित करत होते.

अलीबाबाच्या शेअर मध्ये 26 बिलीयन तोटा झाला होता,चीनी सरकारच्या मिडीया मध्ये अशी बातमी आली होती,चीनी अधिकाऱ्यांनी 'मा' नाव असणाऱ्या व्यक्ती वर प्रतिबंध लावले आहेत. परंतु नंतर सांगण्यात आले की ही बातमी दुसर कोणाच्या संदर्भात होती.

जॅक मा यांना सरकारच्या कैदेतुन निघण्यासाठी अनेक नियमांचे पालन करावे लागले, चीन मध्ये रेगुलेटर्सने 2020 मध्ये एंट ग्रुपचे मोठे लोकार्पण शेवटच्या क्षणी थांबवण्यात आले. किचकट सरकारी नियंत्रणाखाली काम करण्यासाठी कंपनीला आपल्या कार्यपद्धतीत अनेक बदल करावे लागले. सुरुवातीच्या काळात डिजिटल पेमेंट मार्केटमध्ये इतके यश मिळाले की त्यामुळे सरकारी बँकांचे वर्चस्व धोक्यात आले.

एंट यांनी तोंडी देखील सूचित केले की तो कंपनीचे नियंत्रण दुसर्‍या कोणाकडे तरी देऊ शकतो. या प्रकरणाशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की यापैकी एक प्रस्ताव असा आहे की जॅक मा आपले शेअर्स कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांना देतील जेणेकरून एक समिती त्यांच्यावर लक्ष ठेवू शकेल.

या आठवड्यात अनेक फाईल मध्ये अलीबाबा यांनी अनेक वेळा सांगितल की 'मा' एंट ग्रुप कालांतराने गटातील त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आर्थिक स्वारस्य ते 8.8% पेक्षा जास्त नसलेल्या पातळीपर्यंत मर्यादित करेल. सध्या जॅक मा यांच्याकडे एंट ग्रुपमध्ये 50.52% मतदानाचा हक्क आहे.

टॅग्स :ChinaBusiness