esakal | पंजशीरमधील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; अहमद मसूदचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmad Massoud

पंजशीरमधील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; अहमद मसूदचा दावा

sakal_logo
By
सुधीर काकडे

अफगाणिस्तानवर (Aghanistan) तालिबानने (Taliban) ताबा मिळवला असला तरी, देशातला पंजशीर (Panjshir) प्रांत मिळवण्यासाठी तालिबानला मोठा संघर्ष करावा लागतो आहे. काबूलच्या उत्तरकडे असणाऱ्या या भागात अहमद मसूद (Ahmad Massoud) आणि अफगाणिस्तानमधील कोसळलेल्या सरकारचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी तालिबान्यांना जोरदार झुंज दिली आहे. पंजशीरमध्ये सुरु असलेल्या या युद्धाबद्दल तालिबान आणि नॉर्दन अलायन्सकडून वेगवेळे दावे प्रतिदावे केले जात असतानाच, तालिबान्यांना या भागात लढण्यासाठी पाकिस्तानकडून मदत होत असल्याचा दावा रेझिस्टन्स फोर्सचा नेता अहमद मसूद यांनी केला आहे. पंजशीर प्रांत हा दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश असून या ठिकाणी रेझिस्टन्स फोर्सच्या सैनिकांशी लढणे तालिबान्यांना कठीण जाते आहे. गेल्या काही दिवसांत पंजशीरच्या या संघर्षात हजार पेक्षा जास्त तालिबान्यांना ठार केल्याचा दावा नॉर्दन अलायन्सकडून करण्यात आला आहे. त्यातच आता या युद्धात तालिबानला पाकिस्तानकडून मदत होत असल्याचा दावा अहमद मसूदने केला आहे.

पाकिस्तानने केलेल्या बाँब हल्ल्यात फाहिम दाश्तीसह आपल्या कुटूंबातील अनेक सदस्यांचा मृत्यू झाला. पाकिस्तान थेट पंजशीरमधील लोकांना मारत असताना जग शांतपणे पाहतं आहे, अस मसूदने म्हटल्याचे इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तामधून समोर आले आहे. पाकिस्तानच्या मदतीने तालिबानने कितीही हल्ले केले तरी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू असंही मसूद यावेळी म्हणाला आहे.

हेही वाचा: तालिबान्यांकडून 6 विमानांचं अपहरण?;पाहा व्हिडिओ

पंजशीरमध्ये पाकिस्तानी एअर फोर्सच्या ड्रोन्सचा वापर करण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. ड्रोन्समधून पंजशीरमध्ये बॉम्बफेक करण्यात आली आहे. पंजशीरमध्ये स्मार्ट बॉम्बने हल्ला करण्यात आला आहे. पंजशीरमध्ये पाकिस्तान तालिबानला फक्त हवाई मदतच करत नाहीय, तर रेसिस्टन्स फोर्सशी लढण्यासाठी काही स्पेशल फोर्सेसही एअर ड्रॉप करण्यात आल्या आहेत.

loading image
go to top