‘अल जझिरा’चा ब्युरो चीफ; सुदानी सैन्याच्या अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अल जझिरा’चा ब्युरो चीफ; सुदानी सैन्याच्या अटकेत

‘अल जझिरा’चा ब्युरो चीफ; सुदानी सैन्याच्या अटकेत

खार्तुम : सुदानमधील आपल्या ब्युरो चीफला सुदानी सैन्याने पकडले असल्याचा दावा कतारमधील उपग्रह वृत्तवाहिनी ‘अल जझिरा’ने केला आहे. सुदानमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या लष्करी बंडाविरोधात काल (ता. १३) देशभर निदर्शने झाल्यानंतरच या ब्युरो चीफला अटक केली, असा आरोप वाहिनीने केला आहे.

एल मुसाल्मी अल कब्बाशी असे त्याचे नाव आहे. सुदानी सैन्याने त्याच्या घरात घुसून त्याला अटक केल्याचा दावा ‘अल जझिरा’ने ट्विटरवरील निवेदनाद्वारे त केला आहे. सुदानमध्ये काल लष्कराविरोधात निदर्शने झाली.

निदर्शकांना पांगविण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, तर काही ठिकाणी गोळीबारही केला. या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काही वेळाने कब्बाशी यांना अटक करण्यात आली. या अटकेबाबत सुदानी लष्कराने माहिती दिली नसली तरी वार्तांकन केल्यामुळेच त्यांच्यावर कारवाई झाल्याचा अंदाज आहे.

loading image
go to top