जून २०२१ पर्यंत चालेल अॅमेझॉनचे वर्क फ्रॉम होम

वृत्तसंस्था
Thursday, 22 October 2020

अॅमेझॉनने प्रारंभी जानेवारीपर्यंत हा कालावधी नक्की केला होता. बाहेर पडून जोखमीचे काम करणाऱ्या १९ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे अॅमेझॉनने तीन आठवड्यांपूर्वी जाहीर केले होते.

न्यूयॉर्क - कोरोनाच्या जागतिक साथीमुळे घरून काम करण्याचा कालावधी पुढील वर्षी जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय अॅमेझॉनने घेतला आहे. ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी हे लागू आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अॅमेझॉनने प्रारंभी जानेवारीपर्यंत हा कालावधी नक्की केला होता. बाहेर पडून जोखमीचे काम करणाऱ्या १९ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे अॅमेझॉनने तीन आठवड्यांपूर्वी जाहीर केले होते. काही कर्मचारी, निर्वाचित अधिकारी तसेच कर्मचारी संघटनांनी अॅमेझॉनवर टीका केली होती. जागतिक साथ असूनही गोदामे उघडी ठेवून कर्मचाऱ्यांची प्रकृती धोक्यात घालत असल्याचा आरोप झाला होता.त्यावर अॅमेझॉनच्या प्रवक्त्याने सांगितले की, कार्यालयात येणाऱ्यांसाठी फिजीकल डिस्टन्सिंग, संपूर्ण स्वच्छता, मास्क वाटप, सॅनीटायझर अशा विविध उपायांसाठी आम्ही लक्षणीय निधी आणि स्रोतांची गुंतवणूक केली आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रमुख कंपन्यांचे धोरण
    ट्विटर - वर्क फ्रॉम होमसाठी कोणतीही कालमर्यादा नाही
    मायक्रोसॉफ्ट - आठवड्यातील कामकाजाचे निम्मे तास वर्क फ्रॉम होमची परवानगी
    फेसबुक - जुलै 2021 पर्यंत वर्क फ्रॉम होमचा निर्णय
    गुगल - जून 2021 पर्यंत वर्क फ्रॉम होमची परवानगी

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amazon work from home will run until June 2021