esakal | नवऱ्याला घटस्फोट देत थाटला सासऱ्यासोबत संसार

बोलून बातमी शोधा

नवऱ्याला घटस्फोट देत थाटला सासऱ्यासोबत संसार

नवऱ्याला घटस्फोट देत थाटला सासऱ्यासोबत संसार

sakal_logo
By
शर्वरी जोशी

प्रेम, लग्न आणि घटस्फोट या गोष्टींमध्ये आता फारसं नाविन्य राहिलेलं नाही. एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर लोक लग्न करतात. तसंच वैचारिक मतभेद किंवा अन्य कारणांमुळे अनेक जोडपी विभक्तही होतात. अशाच एका विभक्त जोडप्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अमेरिकेतील एका महिलेने पतीसोबत विभक्त होत चक्क सासऱ्यांसोबत नवा संसार थाटला आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे.

अमेरिकेत राहणाऱ्या एरिका किगल आणि जस्टिन टावल या जोडप्याचा २०११ मध्ये घटस्फोट झाला होता. या दोघांना एक मुलगीदेखील आहे. घटस्फोटानंतर एरिकाने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ३१ वर्षीय एरिकाने चक्क तिच्या सासऱ्यांसोबत म्हणजे जस्टिनच्या वडिलांसोबतच दुसरं लग्न केलं आहे. जस्टिनचे वडील सध्या ६० वर्षांचे आहेत.

एरिका आणि जस्टिनचं लग्न झालं त्यावेळी हे दोघं केवळ १९ वर्षांचे होते. परंतु, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. जस्टिनसोबत घटस्फोट घेतल्यानंतर एरिका तिच्या सासऱ्यांच्या म्हणजेच जेफच्या प्रेमात पडली. इतकंच नाही तर, जेफनेदेखील एरिकावर प्रेम असल्याची कबुली दिली आणि त्यांनी २०१८ मध्ये लग्न घेतलं. सध्या जेफ आणि एरिकाला २ वर्षांची लहान मुलगीदेखील आहे.

दरम्यान, एरिका १६ वर्षाची असल्यापासून जेफला ओळखते.त्यामुळे जेफ एक परफेक्ट नवरा असल्याचं तिचं मत आहे. तसंच जस्टिनसोबत घटस्फोट घेतल्यावर एरिकाने तिच्या मुलीची कस्टडी जस्टिनकडे दिली असून त्यानेदेखील दुसरं लग्न केलं आहे.