esakal | अमेरिका-चीन चर्चेत भविष्यावर भर
sakal

बोलून बातमी शोधा

america-china

अमेरिका-चीन चर्चेत भविष्यावर भर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे (America) अध्यक्ष ज्यो बायडेन आणि चीनचे (China) अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात आज दूरध्वनीवरुन दीर्घकाळ चर्चा झाली. अमेरिका आणि चीनमध्ये अनेक मुद्द्यांवरुन तणाव असल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या चर्चेत दोन्ही नेत्यांनी भविष्यातील संबंधांवर अधिक लक्ष केंद्रीत केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बायडेन आणि जिनपिंग यांच्यादरम्यान आज सुमारे दीड तास चर्चा झाली. बायडेन यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून जिनपिंग यांच्याबरोबरील ही दुसरी चर्चा होती. चीनकडून सायबर सुरक्षेचा भंग, कोरोना विषाणूच्या उगमाचा वाद, अमेरिकेकडून चीनवर झालेले आरोप असे वादाचे अनेक मुद्दे असताना बायडेन यांनी त्यांच्या कारकिर्दीत चीनबरोबरील संबंध कसे वाढविता येतील, यावर अधिक लक्ष केंद्रीत केले होते.

हेही वाचा: गुगल लेन्सच्या मदतीने आपण गणिताचे प्रश्न सोडवू शकता

एक समान दृष्टीकोन असलेल्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचे ‘व्हाइट हाऊस’तर्फे सांगण्यात आले. उत्तर कोरियाला अणुशक्ती बनण्यापासून रोखण्यावरही दोघांचे एकमत झाले. बायडेन यांनी अनेक मुद्दे मांडले, मात्र जिनपिंग यांनी त्याला थंडा प्रतिसाद दिला. चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणे अमेरिकेने थांबवावे, अन्यथा फारसे सहकार्य मिळणार नाही, असे जिनपिंग यांनी सुचविले. अमेरिकेने या भेटीबाबत सविस्तर माहिती दिली असताना चीनने, ही चर्चा चांगल्या वातावरणात झाली, एवढीच माहिती दिली.

loading image
go to top