esakal | गोळीबाराच्या दोन घटनेत अमेरिकेत पाच ठार; 15 जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

america

अमेरिकेत गोळीबाराच्या दोन घटना घडल्या असून त्यात पाच जणांचा मृत्यू झालाय. शिवाय पंधरा जण जखमी झाले आहेत

गोळीबाराच्या दोन घटनेत अमेरिकेत पाच ठार; 15 जखमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

फेअरफील्ड टाऊनशिप (अमेरिका)- अमेरिकेत गोळीबाराच्या दोन घटना घडल्या असून त्यात पाच जणांचा मृत्यू झालाय. शिवाय पंधरा जण जखमी झाले आहेत. पहिली घटना न्यू जर्सी येथील फेअरफील्ड टाउनशिपमध्ये झाली. तेथे एका घरात पार्टीदरम्यान गोळीबार झाला. त्यात किमान दोघांचा मृत्यू झाला तर बारा जण जखमी झाले. दुसरी घटना ओहिओच्या यंगस्टाउनलगत झाली. तेथील गोळीबारात तीन जण ठार तर तीन जण जखमी झाले. या दोन्ही घटनांमागे कारण समजू शकले नाही. (america firing during party 5 died injured)

हेही वाचा: फायझर-मॉडर्नाचा राज्यांशी करारास नकार; व्यवहार केवळ केंद्राशी

न्यू जर्सी येथे शनिवारी रात्री एका पार्टीत गोळीबार झाला. तेथे शंभराहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. या पार्टीत युवकांपासून ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. या गोळीबारात ३० वर्षाचा युवक आणि २५ वर्षाची युवती ठार झाली. महापौर बेन्जामिन बेअर्ड यांनी म्हटले की, पार्टीत शस्त्रे कशी आणली हे कोणालाही माहीत नाही आणि त्याचा तपास सुरू आहे. दुसरीकडे यंगस्टाउन येथे रविवारी सकाळी टॉच क्लब बार ॲड ग्रील भागात गोळीबार झाला. याप्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेतले नसून पार्टीत सहभागी झालेल्या लोकांची चौकशी सुरू आहे. प्रत्यक्षदर्शीच्या मते, पार्टीत नऊ फैरी झाडल्याचा आवाज आपल्या कानावर आला. यासंदर्भात पोलिसांना किती शस्त्रे वापरण्यात आली, अशी विचारणा केली असता त्यांनी कोणतेही मत नोंदवले नाही.

loading image
go to top