
अमेरिकेत (America) गोळीबाराची आणखी एक घटना समोर आलीय.
अमेरिकेत चाललंय तरी काय? वॉशिंग्टनमध्ये पुन्हा अंदाधुंद गोळीबार
अमेरिकेत (America) गोळीबाराची आणखी एक घटना समोर आलीय. राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये (Washington DC) गोळीबाराची ही नवीन घटना घडलीय. वॉशिंग्टन डीसी इथं एका संगीताच्या कार्यक्रमादरम्यान (Music Program) एका पोलिस (American Police) अधिकाऱ्यासह अनेकांना गोळ्या घातल्या गेल्याचं यूएस मीडियाचं म्हणणं आहे.
गोळीबाराच्या ताज्या घटनेत, वॉशिंग्टन डीसीमध्ये एका संगीताच्या कार्यक्रमाजवळ एका पोलिस अधिकाऱ्यासह अनेकांना गोळ्या घालण्यात आल्याचं वृत्त आहे. या घटनेला अमेरिकन मीडियानं (American Media) दुजोरा दिलाय. वॉशिंग्टनमध्ये झालेल्या या गोळीबारात एका पोलिस अधिकाऱ्यासह अनेक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय. जखमींची माहिती अद्याप मिळू शकली नाहीय.
हेही वाचा: काबूलमधील गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला; प्रार्थनास्थळी दिसले धुराचे लोट
मेट्रोपॉलिटन पोलिस विभागाच्या (Metropolitan Police Department) प्रवक्त्यानं सांगितलं की, यू स्ट्रीटवर झालेल्या गोळीबारात एका पोलिस अधिकाऱ्यासह अनेकांना गोळ्या लागल्या आहेत. या घटनेनंतर तिथं बचावकार्य सुरूय. अधिकारी रस्त्यावर पडलेल्या अनेक लोकांना मदत करत आहेत.
Web Title: America Firing Multiple People Including Police Officer Shot At Washington Music Concert Us Media
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..