US Shooting: ख्रिसमसनंतर प्रथमच सुरू झालेल्या अमेरिकेतील शाळेत गोळीबार; 1 विद्यार्थी ठार तर 5 जखमी

अमेरिकेत ख्रिसमस आणि नवीन वर्षानंतर काल(गुरुवारी) प्रथमच शाळा सूरू झाल्या. आयोवा येथील एका शाळेत अचानक घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला.
US Shooting
US ShootingEsakal

अमेरिकेत ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्या, तेव्हा पहिल्याच दिवशी शाळेत झालेल्या गोळीबाराच्या घटनेने देश हादरला. अमेरिकेच्या आयोवा राज्यात घडलेल्या या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. या घटनेतील संशयित शूटरने स्वतःवर गोळी झाडली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.

आयोवा येथील पेरी हायस्कूलमध्ये गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) ही घटना घडली. सार्वजनिक सुरक्षा विभागाचे अधिकारी मिच मॉर्टवेट यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

US Shooting
दहशतवाद्यांच्या मुख्यालयावर हल्ला; इराकमधील कारवाईत ‘पीएमएफ’चा म्होरक्या ठार

सहावीच्या वर्गातील विद्यार्थ्याचा मृत्यू

संबधित आधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गोळीबारात ५ जण जखमी झाले असून त्यापैकी सहाव्या वर्गातील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. पेरी स्कूलच्या प्राचार्यालाही गोळ्या घालण्यात आल्या. एका पीडिताची प्रकृती गंभीर आहे, तर इतर चार जणांची प्रकृती स्थिर आहे.

US Shooting
Hamas Leader Killed : हमासचा म्होरक्या बैरूतमध्ये ठार; इस्राईलनेच हल्ला केला असल्याचा हिज्बुल्लाचा आरोप

१७ वर्षीय तरुणाने केला गोळीबार

एबीसी न्यूजनुसार, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ तेथे पोहोचले. तेथे अधिकाऱ्यांना विद्यार्थी आणि शिक्षक लपून बसलेले किंवा ठिकाणाहून पळताना दिसले. मॉर्टवेटने सांगितले की, शूटरचे नाव 17 वर्षीय डायलन बटलर असे आहे. तो गोळीबार आणि हँडगनसह मृतावस्थेत आढळून आला.

गोळीबार करण्यापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट

गोळीबार करणाऱ्याच्या पार्श्‍वभूमीबद्दल जे काही आहे ते तपासाचा भाग आहे आणि साहजिकच आम्ही त्याचा सखोल शोध घेणार आहोत. गोळीबाराच्या वेळी संशयिताने सोशल मीडियावर अनेक पोस्टही केल्या होत्या. घटनेचा तपास सुरू आहे.

US Shooting
World Braille Day 2023 : स्वत: अंध असतानाही जगभरातल्या अंधांसाठी ‘डोळस’ कामगिरी करणारा अवलिया; लुई ब्रेल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com