America Iran Dispute : अमेरिका-इराण तणाव शिगेला; अमेरिकी तळांवर हल्ल्याचा इराणचा इशारा; ट्रम्प यांचीही धमकी

अणुकरार करत इराणवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील असून त्यासाठी ट्रम्प यांनी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.
America Army Power

America Army Power

sakal

Updated on

वॉशिंग्टन, तेहरान - अमेरिकेने पश्‍चिम आशियात दोन विमानवाहू युद्धनौका, लढाऊ विमाने आणि इंधन पुरवठा करणाऱ्या जहाजांसह मोठे लष्करी बळ तैनात केले असल्याने अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अणुकरार करण्यासाठी इराणला दहा दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. त्यावर इराणनेही इशारा देताना, आमच्या देशाला धोका निर्माण झाल्यास अमेरिकेच्या तळांवर हल्ला करू, असे म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com