...म्हणून जो बायडेन राष्ट्राध्यक्ष झाले; मस्क यांचे खोचक ट्वीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Trump-and-Biden

...म्हणून जो बायडेन राष्ट्राध्यक्ष झाले; मस्क यांचे खोचक ट्वीट

वॉशिंग्टन : जगातील सर्वात श्रीमंत आणि अमेरिकन इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्ला मोटर्सचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) ट्विटरवर सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपले मत मांडत असतात. त्यातीलच एका ट्वीटवर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यावेळी मस्क यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्याबद्दल ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची खिल्ली उडवली असून, लोकांना कमी ड्रामा हवा होता, म्हणून बायडेन यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे खोचक ट्वीट मस्क यांनी केले आहे. (Elon Musk Tweet On Donal Trumph & Jo BIden)

एलॉन मस्क यांनी ट्वीट केले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, 'जो बायडेन अमेरिकेला बदलण्यासाठी निवडले गेले आहे हे असे समजणे चुकीचे आहे. लोकांना कमी ड्रामा हवा होता म्हणून त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अध्यक्षीय निवडणूक जिंकली. तत्पूर्वी, मस्क यांनी 2024 साली अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकीबाबतही ट्विट केले होते. ते म्हणाले- '2024 च्या निवडणुकीत कमी फूट पाडणारा उमेदवार चांगला असेल'.

मस्क यांचा ट्रम्प यांना पाठिंबा

अलीकडेच ट्वीटर विकत घेतलेल्या एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांचे ट्विटर हँडल ब्लॉक करणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. तसेच ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू केले पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या होत्या. शिवाय ट्रम्प यांच्यावर करण्यात आलेली कारवाई मूर्खपणाची असल्याचे म्हटले होते.

Web Title: America Joe Biden Won Over Donald Trump As Us People Wanted Less Drama Says Elon Musk

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top