esakal | कोरोना असताना जगावर आस्मानी संकट?; अमेरिकेने शेअर केले उडत्या तबकड्याचे व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

america pentagon ufo video viral social media

‘सोशल मीडियामध्ये फिरत असलेले हे व्हिडिओ खरे आहेत की नाही किंवा या व्हिडिओमध्ये काय आहे, याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे.

कोरोना असताना जगावर आस्मानी संकट?; अमेरिकेने शेअर केले उडत्या तबकड्याचे व्हिडिओ

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

वॉशिंग्टन (अमेरिका) : कोरोनाचं संकट असताना, जगावर आणखी एक संकट ओढवतंय की काय? अशी परिस्थिती आहे. अमेरिकेच्या पेंटॅगॉन’ या संरक्षण मुख्यालयाने तीन तबकडक्यांचे व्हिडिओ शेअर केल्यानं जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेचा लष्करी मुख्यालय असलेल्या ‘पेंटॅगॉन’ने तीन उडत्या तकबड्यांसारख्या (यूएफओ) दिसणाऱ्या वस्तूंचे तीन व्हिडिओ आज प्रसिद्ध केले. या व्हिडिओमधील ‘यूएफओं’बाबत काहीही माहिती देण्यात आलेली नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पेंटॅगॉनने प्रसिद्ध केलेले तिन्ही व्हिडिओ आधीच माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर लीक झाले होते. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या वस्तू उडत्या तबकड्याच आहेत, असा दावा काही जण अनेक वर्षांपासून करत आहेत. त्यामुळे पेंटॅगॉनने अधिकृतरित्या हे व्हिडिओ प्रसिद्ध करत स्पष्टीकरण दिले आहे. ‘सोशल मीडियामध्ये फिरत असलेले हे व्हिडिओ खरे आहेत की नाही किंवा या व्हिडिओमध्ये काय आहे, याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. मात्र, या व्हिडिओंचा सखोल अभ्यास केला असता त्यात चिंता करण्यासारखे अथवा संवेदनशील असे काही नसल्याचे दिसून आले आहे. तसेच, अज्ञात हवाई वाहनांची घुसखोरी असण्याचीही शक्यता नसून तशाप्रकारच्या चौकशीची गरज नसल्याचे स्पष्ट झाले आहे,’ असे निवदेन पेंटॅगॉनने प्रसिद्ध केले आहे.

आणखी वाचा - उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षेचं काय?

हे व्हिडिओ २००७ आणि २०१७ मध्ये अनधिकृतरित्या प्रसिद्ध झाले होते. व्हिडिओमध्ये तबकड्या दिसणाऱ्या वस्तू काय आहेत, याबाबत अद्यापही निश्‍चित माहिती नसून त्यांची नोंद अजूनही ‘अज्ञात’ अशीच आहे. अमेरिकेत २००४ आणि २०१५ मध्ये प्रशिक्षण सुरु असताना वैमानिकांना अवकाशात या वस्तू दिसल्या होत्या. यावेळी पेंटॅगॉनने पुढाकार घेऊन हे व्हिडिओ प्रसिद्ध केल्याने या ‘यूएफओं’बाबत अधिक अभ्यास होण्याची शक्यता आहे. 
 

loading image
go to top