अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक कायम; एका दिवसात वाढले तब्बल एवढे रुग्ण

अशोक गव्हाणे
Friday, 17 July 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात असून याचा फटका पूर्ण जगालाच बसला आहे. परंतु, याचा सर्वाधिक फटका हा अमेरिकाला बसला आहे. तिथे रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दररोज वाढणारा आकडा हा काही केल्या कमी होताना दिसत नाही. अमेरिकेत गेल्या २४ तासात तब्बल ६७६३२ नवीन रुग्ण सापडले आहेत.

न्यूयॉर्क : कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात असून याचा फटका पूर्ण जगालाच बसला आहे. परंतु, याचा सर्वाधिक फटका हा अमेरिकाला बसला आहे. तिथे रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दररोज वाढणारा आकडा हा काही केल्या कमी होताना दिसत नाही. अमेरिकेत गेल्या २४ तासात तब्बल ६७६३२ नवीन रुग्ण सापडले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मागील १० दिवसांपासून प्रत्येक दिवशी अमेरिकेत ५५ हजार ते ६५ हजारापर्यंत रोज नवीन रुग्ण सापडत असून बुधवारपासून हा आकडा ६५ हजार पार करत आहे. काल (ता. १६) सापडलेल्या रुग्णांचा आकडा हा आजपर्यंतचा सर्वाधिक आहे. ही माहिती जॉन हॉपकिन्स यूनिवर्सिटी ने दिली आहे.

दरम्यान, भारतातही काल (ता. १६) गुरुवारी एकाच दिवसात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. मागील २४ तासात कोरोनाचे ३२ हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ९ लाख ६८ हजारापेक्षा जास्त झाली आहे. तसेच, काल २० हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्ण बरे झाले आहेत.

बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ६३.२४ टक्के झाले असून ते आतापर्यंतचे जास्त आहे. देशभरात कोरोनाच्या आजारातून आतापर्यंत देशात ६,१२,८१४ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, सध्या ३,३१,१४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी कोरोनामुळे आणखी ६०६ लोक मरण पावले असून, त्यामुळे एकूण बळींची संख्या २४, ९१५ झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: america records more than 67000 new covid 19 cases in 24 hours