अमेरिकेने मानसिकता बदलावी; चीनची टीका

अमेरिकेच्या उपपरराष्ट्र मंत्री वेंडी शेरमन यांच्या चीनदौऱ्यावर दाखल होण्यापूर्वीच चीनने अमेरिकेवर आगपाखड केली आहे.
Shi Feng
Shi FengSakal
Updated on

तिआनजिन - अमेरिकेच्या (America) उपपरराष्ट्र मंत्री वेंडी शेरमन (Vendi Sherman) यांच्या चीनदौऱ्यावर (China Tour) दाखल होण्यापूर्वीच चीनने अमेरिकेवर आगपाखड केली आहे. चीनबरोबरील द्वीपक्षीय संबंध बिघडण्यास अमेरिकाच कारणीभूत असून त्यात सुधारणा करण्यासाठी अमेरिकेने त्यांची अत्यंत पूर्वग्रहदूषित असलेली मानसिकता आणि धोकादायक धोरणे बदलणे आवश्‍यक आहे, असे चीनचे उपपरराष्ट्र मंत्री शी फेंग (Shi Feng) यांनी म्हटले आहे. (America Should Change the Mindset Criticism of China)

वेंडी शेरमन या आज चीनमध्ये दाखल झाल्या. त्यांनी शी फेंग यांच्याबरोबरच परराष्ट्र मंत्री वँग यी यांचीही भेट घेतली. ज्यो बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर दोन देशांमधील ही पहिलीच चर्चा होती. मात्र, त्यापूर्वीच फेंग यांनी अमेरिकेवर टीका केली. ‘चीनचा विकास रोखण्याचा आणि अडथळे आणण्याचा बायडेन सरकारचा प्रयत्न आहे. चीन हा शत्रू आहे, अशी समजूत अमेरिकेने करून घेतली असल्याने संबंध सुधारण्यात अडचणी निर्माण होत आहेत, असे फेंग म्हणाले.

Shi Feng
कोरोनामुळे 'या' देशात दगावली सर्वाधिक मुले; जुलैमध्ये वाढलं प्रमाण

आपण दुसऱ्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत, या भूमिकेतून अमेरिका इतर देशांशी वागत असते. त्यांचा हा दृष्टीकोन आम्हाला मान्य नाही. दुसऱ्या देशांना समान वागणूक देणे अमेरिकेने शिकून घ्यावे, अन्यथा त्यांना तसा धडा शिकविण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय समुदाय स्वीकारेल.

- वँग यी, परराष्ट्र मंत्री, चीन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com