
विमान, रेल्वेसह वाहतूक सेवा विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी वाहनं बर्फात अडकली आहेत.
Bomb Cyclone : बॉम्ब चक्रीवादळात अमेरिका गारठलं; तुफान वादळात 18 जणांचा मृत्यू, 5 हजारहून अधिक उड्डाणं रद्द
वॉशिंग्टन : अमेरिकेत मोठ्या प्रमाणात बर्फाचं वादळ (America) पहायला मिळातंय. या ‘बॉम्ब चक्रीवादळ’मुळं आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झालाय. तर, संपूर्ण यूएसमध्ये बर्फाळ वारं वाहताना दिसत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेत 5200 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारपर्यंत देशभरातील विमान कंपन्यांनी (Airlines) सुमारे 5200 यूएस उड्डाणं रद्द केली आहेत, त्यामुळं सुटीवर जाणाऱ्या हजारो नागरिकांची निराशा झालीये. हे बर्फाचं वादळ पाहता विमान कंपन्यांनी ही उड्डाणं रद्द केली आहेत. सध्या संपूर्ण अमेरिकेत बर्फाळ वारं वाहू लागलंय.
हेही वाचा: Tunisha Sharma : तुनिशाला आत्महत्येस प्रवृत्त करायला लावणारा शीजान खान आहे तरी कोण?
कॅनडाच्या सीमेजवळील हाव्रे, मोंटाना इथं 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये. विमान, रेल्वेसह वाहतूक सेवा विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी वाहनं बर्फात अडकली आहेत. याशिवाय, अनेक उड्डाणंही रद्द करण्यात आली आहेत. हजारो अमेरिकन विमानतळांवर अडकून आहेत. देशातील 20 कोटी लोक म्हणजे, सुमारे 60 टक्के लोक थंडीचा सामना करत आहेत.
हेही वाचा: Ramdas Athawale : सोनियांनीच राहुल गांधींना पंतप्रधान होऊ दिलं नाही; रामदास आठवलेंचा मोठा गौप्यस्फोट
अमेरिकेत वादळाचा रेड अलर्ट
संपूर्ण अमेरिकेत या वादळाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाची ऊर्जा व्यवस्था कोलमडलीये. वादळामुळं ट्रान्समिशन लाईन्सचं मोठं नुकसान झालं असून 20 लाखांहून अधिक घरांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. या बॉम्ब चक्रीवादळांमुळं बर्फाचं वादळं होऊन मुसळधार पाऊस पडत आहे.