
नवी दिल्लीः अमेरिकेतल्या दक्षिणेकडील मिसुरी आणि केंटकी राज्यांना चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. या वादळामुळे वीसहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
केंटकी राज्याचे गव्हर्नर अँडी बेशियर आणि एक्स अकाऊंटवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री राज्याला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला. त्यात १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मिसुरीमध्ये सात जणांना जीव गमवावा लागला.