मिडल ईस्टमधून अमेरिकन सैन्य मागे घेणार; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 11 September 2020

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातील चार हजार सैनिक अल्पकालावधीत माघारी बोलाविण्याची घोषणा केली आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातील चार हजार सैनिक अल्पकालावधीत माघारी बोलाविण्याची घोषणा केली आहे. अन्य देशांत तैनात अमेरिकेचे लष्कर देखील माघारी बोलाविण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे .अफगाणिस्तानच्या आघाडीवर आम्ही बरीच प्रगती केली असून त्यामुळे तेथून आम्ही चार हजार सैनिक तातडीने माघारी बोलावण्याच्या तयारीत आहोत, असे ट्रम्प यांनी व्हाईट हाउसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. अमेरिका इराकमधून देखील दोन हजार सैनिक माघारी बोलावण्याच्या तयारीत असून सीरियामधील अमेरिकेचे सैनिक देखील परतीचा मार्ग धरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोदी सरकारला मोठा झटका; ग्लोबल इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्समधून भारत 100 मधून बाहेर

सीरियातील खाणींना संरक्षण

अमेरिकेचे सैनिक हे सीरियामध्ये तेलांच्या खाणीचे संरक्षण करत आहेत, आम्ही तिथे कुर्द लोकांना मदत करत आहोत. तेथील लोकांचे जीवनमान उंचावण्यास अमेरिकी सैनिकांचा मोठा हातभार लागत आहे असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. अफगाणिस्तानामध्ये होणाऱ्या शांतता संमेलनात अमेरिका सहभागी होणार असून यामध्ये परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दहशतवादाविरोधात पाकचं मोठं बलिदान; चीनचं हास्यास्पद वक्तव्य

अण्वस्त्रे सुरक्षितच

अमेरिकेकडे सध्या अद्वितीय अशी आण्विक शस्त्रसंपदा असून त्याविषयी कुणालाही काही माहीत नाही. त्यामुळे तिच्याशी संबंधित माहिती उघड होणे शक्यच नसल्याचा दावा ट्रम्प यांच्याकडून करण्यात आला आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध शोध पत्रकार बॉब वूडवर्ड यांनी ‘रेज’ नामक पुस्तक लिहिले असून त्यामध्ये त्यांनी अमेरिकेच्या आण्विक कार्यक्रमाशी कागदपत्रे उघड झाल्याचा दावा केला होता. वूडवर्ड यांचे आरोप ट्रम्प यांनी फेटाळून लावले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: american army man will be return to home said donald trump